नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)  बुधवारी कॅनडाशी संबंध असणाऱ्या 43 दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील केला जारी. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबतची माहिती लोकांनी एनआयएला द्यावी, असं आवाहनही केलंय. एनआयएने जारी केलेल्या  यादीतील काही गँगस्टर हे तुरुंगात आहे तर काही फरार असून परदेशात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहे. या यादीमध्ये  पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा समावेश होता. 


गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी NIA वेळोवेळी कारवाई करत असते. काही दिवसंपूर्वी भारतीय तुरुंगात बंद असलेल्या अनेक गुन्हेगारांचे तुरुंग बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर गँगवॉर, खंडणी व इतर गुन्ह्यांतील संघटित मालमत्ता जप्त करून चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आता तपास यंत्रणा 43 गुन्हेगारांच्या मालमत्तेची माहिती गोळा करत आहे, जेणेकरून त्यांच्यावर पुढील कारवाई करता येईल. गँगस्टरच्या प्रॉपर्टी, काळेधंदे याविषयी कोणाकडे कोणतीही माहिती असल्यास त्याविषयी माहिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय तपास यंत्रणेने केले आहे. 






राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 12 गँगस्टरचे फोटो जारी करण्यात आले आहे. यामध्ये गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, अर्शद्वीप सिंह गिल, लखबीर सिंह लांडा, दिनेश गांधी, नीरज पंडित, गुरपिंदर सिंह, सुखदूल सिंह, गौरव पटयाल , सौरव आणि दलेर सिंह यांचे फोटो देखील जारी केले आहे. पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रार आणि दल्ला यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहे. 


पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या असेल किंवा सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न..  लॉरेन्स बिष्णोई स्वतः बॉलिवूडमधल्या हिरोपेक्षा कमी नाही. पोलिसांच्या कस्टडीत असतानाही त्याचे काढले जाणारे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळोवेळी पोस्ट होत असतात . त्यासाठी त्याची टोळी काम करते आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बिष्णोई टोळीने पंजाब , हरियाणा , दिल्ली , उत्तर प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश , महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये 600 पेक्षा अधिक शार्प शूटरच जाळं विणलय.28 वर्षाचा लॉरेन्स तिहार तुरुंगातून टोळीचा कारभार चालवतो.  तुरुंगात कैद असताना त्याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तर रचलाच, शिवाय त्यानंतर व्यवस्थेच्या नावावर टिच्चून त्या हत्येची कबुली सोशल मीडियावरून स्वतःहून दिली.  


हे ही वाचा:


जम्मू-काश्मीरमध्ये आता CRPF जवानांची नजर! कोब्रा कमांडोची पहिली तुकडी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये तैनात