Joe Biden Republic Day Invitation: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (America) जो बायडन (Joe Biden) यांना 26 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) समारंभासाठी आमंत्रित केलं आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी (20 सप्टेंबर) यासंदर्भात माहिती दिली.


एरिक गार्सेटी (Eric Garcetti) यांनी सांगितलं की, दिल्लीतील G-20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. त्याचवेळी भारतात क्वाड शिखर परिषदेचं नियोजन केलं जात आहे का? असं विचारलं असता, अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेटी यांनी मला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सांगत कोणतंही वक्तव्य करणं टाळलं.    


भारताकडे क्वाड समिटचं यजमानपद 


क्वाडमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. पुढील वर्षी वार्षिक क्वाड समिट आयोजित करण्याची भारताची वेळ आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी भारत क्वाड देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.


जगभरातील नेते आमंत्रित 


इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जागभरातील नेत्यांना आमंत्रित करतो. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, 2021 आणि 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते. पण यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह इतरही जगभरातील नेते मुख्य अतिथी असतील. 


'हे' नेतेही होते यापूर्वींच्या प्रजासत्ताक दिनासाठी आमंत्रित 


यापूर्वी 2020 मध्ये ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो प्रमुख पाहुणे होते. 2019 मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, तर 2018 मध्ये, सर्व 10 ASEAN देशांचे नेते समारंभात सहभागी झाले होते. 2017 मध्ये, अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते, तर 2016 मध्ये, तत्कालीन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.


अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2015 मध्ये परेड पाहिली होती. 2014 मध्ये, तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते, तर भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी 2013 मध्ये परेडमध्ये भाग घेतला होता. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर राज्य आणि सरकार प्रमुखांमध्ये निकोलस सारकोझी, व्लादिमीर पुतिन, नेल्सन मंडेला यांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Canada India Tension: दहशतवाद्याच्या हत्येनं भारत कॅनडात तणाव; 30 भारतीय कंपन्यांची चिंता वाढली, कॅनडालाही फटका बसणार