एक्स्प्लोर

Dinkar Gupta appointed NIA DG : NIA चे नवे प्रमुख दिनकर गुप्ता, ज्यांनी IAS पत्नीच्याही नेतृत्वाखाली केले काम, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Dinkar Gupta appointed NIA DG : पंजाबमध्ये डीजीपी म्हणून काम करताना दिनकर गुप्ता यांनी पत्नी विनी महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम केले.

Dinkar Gupta appointed NIA DG : पंजाबचे माजी DGP दिनकर गुप्ता यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. पंजाब केडरचे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी दिनकर गुप्ता 31 मार्च 2024 पर्यंत या पदावर असतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निवृत्तीच्या तारखेपर्यंत NIA चे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

दहशतवादाचे नेटवर्क केले उद्धवस्त

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दहशतवादविरोधी एजन्सीची स्थापना करण्यात आली होती. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांना गेल्या वर्षी मे महिन्यात एनआयएचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. पोलिस प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या गुप्ता यांनी 2019 मध्ये पंजाब पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आणि दोन वर्षे सात महिने या पदावर काम केले. त्यांनी पंजाबमध्ये डीजीपी इंटेलिजन्सचे पदही भूषवले होते. केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी परवानगी मागितल्याने त्यांची नंतर पंजाब पोलीस गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष म्हणून बदली करण्यात आली. याशिवाय त्यांनी पंजाबमधील लुधियाना, जालंधर आणि होशियारपूर जिल्ह्यांचे एसएसपी पद भूषवले होते, जेव्हा दहशतवाद ही एक मोठी समस्या म्हणून उदयास येत होती.

पोलीस शौर्य पदके

दिनकर गुप्ता यांनी यापूर्वी जून 2004 ते जुलै 2012 या कालावधीत केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आठ वर्षे काम केले होते. यावेळी त्यांनी व्हीव्हीआयपींची सुरक्षा पाहणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. दिनकर गुप्ता यांना 1992 आणि 1994 मध्ये दोन पोलीस शौर्य पदके देण्यात आली. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक आणि विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पोलीस पदक (2010) देखील राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. 1999 मध्ये दिनकर गुप्ता यांना ब्रिटिश कौन्सिलने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ब्रिटीश चेवनिंग गुरुकुल शिष्यवृत्ती प्रदान केली.

चन्नी सरकारच्या काळात डीजीपी पदावरून हटवले
पंजाबमध्ये, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांनी दिनकर गुप्ता यांच्या जागी 1988 बॅचचे अधिकारी इक्बाल प्रीत सिंग सहोता यांच्याकडे डीजीपीची जबाबदारी सोपवली. चन्नी मुख्यमंत्री होताच गुप्ता यांनी महिनाभराच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.

पत्नीच्या नेतृत्वाखाली काम केले
पंजाबमध्ये डीजीपी म्हणून काम करताना दिनकर गुप्ता यांनी पत्नी विनी महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम केले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारने राज्याच्या मुख्य सचिवपदी विनी महाजन यांची नियुक्ती केली होती. हा तो काळ होता, जेव्हा पंजाबच्या महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या पती-पत्नी दोघांच्याही खांद्यावर होत्या. त्यामुळे दिनकर गुप्ता यांना त्यांच्या पत्नी मुख्य सचिव विनी महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागले. विनी महाजन याही दिनकर गुप्ता यांच्याप्रमाणेच 1987 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget