Corona Travel Guildelines: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं (Central Government) परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी (International Arrivals) गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर आठव्या दिवशी प्रवाशांची आरटीपीआर चाचणी केली जाणार आहे. कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतरच प्रवाशांना विमानतळ परिसर सोडण्याची परवानगी दिली जाणार. हे आदेश 11 जानेवारीपासून लागू होतील आणि पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.


एएनआयचं ट्वीट-



केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स-
- जे प्रवाशांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांना सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. 
- त्यानंतर आठव्या दिवशी प्रवाशांची आरटीपीआर चाचणी केली जाईल. 
- पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने सिक्केन्सिंगसाठी INSACOG प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील. 
- पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आयसोलेशन ठेवलं जाईल आणि प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार केले जातील.
- यानंतर राज्यांना या प्रवाशांच्या संपर्काचा शोध घ्यावा लागेल. मात्र, निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना पुढील 7 दिवस सेल्फ मॉनिटर करावं लागणार आहे. 


ज्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणीसाठी नमुने द्यावे लागणार आहे. यासाठी त्यांना पैसे द्यावा लागतील. तसेच प्रवाशांना बाहेर जाण्यासाठी किंवा विमान प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल येऊपर्यंत थांबाव लागेल.


सर्व प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी ऑनलाइन एअर सुविधा पोर्टलवर स्वत:बाबत माहिती द्यावी लागेल, ज्यामध्ये मागील 14 दिवसांच्या प्रवासाचा तपशील देखील समाविष्ट असेल. प्रवाशांना प्रवासाच्या 72 तासापूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अपलोड करावा लागणार आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha