India Omicron Death : ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढताना दिसत आहे. आता देशात या व्हेरियंटनं दुसरा मृत्यू झाला आहे. ओदिशातील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमायक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 73 वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.
दरम्यान, 27 डिसेंबर रोजी संबलपूर जिल्ह्यातील वीर सुरेंद्र साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था (VIMSAR) मध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु, आता मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्यामुळेच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अगलपूर गावात राहणाऱ्या या रुग्णानं कोणतीही विदेशवारी केलेली नव्हती. गेल्या महिन्यात या व्यक्तीला स्ट्रोक झाला होता. ज्यानंतर उपचारानंतर त्याला 20 डिसेंबर रोजी बालांगीरच्या भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
बोलांगीरच्या CDMO स्नेहलता साहू यांनी सांगितलं की, दोन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचारादरम्यान, महिलेला संबलपूर बुर्लाच्या VIMSAR मध्ये रेफर करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकृती खालावल्यानंतर महिलेचा कोरोना चाचणीसाठी सॅम्पल घेण्यात आला. पुढच्या दिवशी म्हणजेच, 23 डिसेंबर रोजी महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आली होती.
जयपूरमध्ये ओमायक्रॉनबाधिताचा मृत्यू
जयपूरमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला मधूमेहासह आणखी काही आजार होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, ओमायक्रॉन संसर्गाचा अहवाल येण्याआधी या व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी त्याचा मृत्यू हा ओमायक्रॉनमुळेच झाला आहे. कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर नियमानुसार उपचार सुरू होते. कोरोना उपचारांबरोबरच त्याच्या इतर आजारांवरही उपचार सुरू होते. ओमायक्रॉनचा अहवाल येण्याआधी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. नियमावलीनुसार त्या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याचे मानले जाते. त्यानंतर त्याचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू हा ओमायक्रॉनमुळे झाल्याचे मानले जाते.
महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांचा स्फोट
देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना महाराचीचं सावट गडद झाले आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी देशभरात 90 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची नोंद झाली. दिवसागणिक वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे अनेक राज्यात निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीसह केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट अधिक गडद होऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांचा स्फोट, पाहा कोणत्या राज्यात काय परिस्थिती?
- वाढत्या कोरोनावर फुल्ल स्पीड लसीकरणाचा उतारा; देशात लसीकरणाच्या दीडशे कोटी डोसचा टप्पा पार
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट ; शास्त्रज्ञांचा अंदाज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह