एक्स्प्लोर
आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक
नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बाद ठरवल्यानंतर लवकरच 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आरबीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
यावेळी 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा कशा असतील, याची झलकही आरबीआयकडून दाखवण्यात आली. या नव्या नोटा 10 नोव्हेंबरपासून चलनात आणल्या जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कशी असेल पाचशेची आणि 2 हजार रुपयांची नोट?
पाचशेची नवी नोट राखाडी रंगाची असून त्यामागे लाल किल्ल्याचे चित्र असणार आहे. तर 2000 रुपयाची नोट गुलाबी रंगाची असून त्यामागे मंगळयानाचं चित्र छापण्यात येणार आहे. लवकरच या नव्या नोटा चलनात येतील, असे आरबीआयचे अध्यक्ष उर्जित पटेल यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement