Passport Police Clearance Certificate: केंद्र सरकारने नियमात बदल केल्याने पासपोर्ट बनवणं आता आणखी सोपं झालं आहे. हे नवीन नियम आजपासून म्हणजेच 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरात लागू झाले आहेत. आतापर्यंत पासपोर्ट मिळवण्यासाठी अधिक वेळ हा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच पीसीसीच्या मंजुरीमध्ये लागत होता. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने हीच समस्या लक्षात घेऊन यावर तोडगा काढला आहे. आता पासपोर्ट अर्जदार सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (Police Clearance Certificate) अर्ज करता येणार आहे. यामुळे अर्जदारांच्या वेळेची बचत होऊन लवकरात पासपोर्ट हे अर्जदारांना मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसद्वारे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट
आजपासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नागरिक ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांद्वारे (POPSKs) हा अर्ज करू शकतात. तत्पूर्वी याबाबत निवेदन जरी करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होत की, गेल्या काही महिन्यांपासून पासपोर्ट बनवण्यासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या (पीसीसी) मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रातून पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातच पोलिस मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया अनिवार्य आहे, कारण अर्जदाराच्या गुन्हेगारी नोंदी जर असतील तर, त्यांना पासपोर्ट मिळू देण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे.
क्लिअरन्स महत्वाचे का आहे?
तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करता तेव्हा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यासोबतच या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणीही केली जाते. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पोलिस भेट देतात आणि तिथे जाऊन तुमच्या कागदपत्रांची माहिती घेतात. याशिवाय आजूबाजूला तुमच्याबद्दल माहिती मिळवतात.
असा करा पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करा (Apply for passport online)
- यासाठी तुम्ही पासपोर्टच्या अधिकृत वेबसाइट passportindia.gov.in ला भेट द्या.
- जर तुम्ही User ID आणि Password तयार केला असेल तर तो टाकून लॉगिन करा, अन्यथा User ID आणि Password तयार करा.
- नोंदणीसाठी New User वर क्लिक करा आणि Register Now हा पर्याय निवडा.
- त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून कॅप्चा कोड टाका.
- त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
- पुढे तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला जवळच्या पासपोर्ट ऑफिसचे तपशील, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि लॉगिन आयडी यासारखी सर्व माहिती भरायची आहे.
- यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून माहिती सेव्ह करा.
- लक्षात ठेवा की रिलीझ फील्डमध्ये प्रदान केलेली माहिती योग्य असणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीमुळे फॉर्म नाकारला जाईल.
- आता यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला (जेथे पासपोर्ट सेवा केंद्र बनवले आहे) भेट द्यावी लागेल.
- तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या अर्जाची पावती आणि मागितलेली सर्व मूळ कागदपत्रेही ठेवावीत.
- त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये पडताळणी आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- यानंतर पोलिस पडताळणीनंतर तुमचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केला जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या: