New CDS Lt General Anil Chauhan (Retired): लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल चौहान (Anil Chauhan) हे देशाच्या डीजीएमओ लष्कराच्या पूर्व कमांडचे कमांडर राहिले आहेत. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 40 वर्षांपेक्षा जास्त काळातील कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांनी अनेक कमांड सांभाळल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दहशतवादविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सीडीएसचे लष्करी पद रिक्त होते. पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून जनरल अनिल चौहान यांच्या कार्यकाळात, ईशान्येकडील भागात दहशतवादात लक्षणीय घट झाली. परिणामी अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये सैन्याच्या तैनातीमध्ये घट करण्यात आली.


कोण आहेत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान?


लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. 1981 मध्ये भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. लेफ्टनंट जनरल चौहान यांनी 1981 ते 2021 या काळात लष्करात महत्त्वाच्या पदांवर काम केले. 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ते 31 मे 2021 रोजी लष्कराच्या पूर्व कमांडच्या प्रमुख (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) या पदावरून निवृत्त झाले. पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल चौहान यांच्या कार्यकाळात ईशान्येकडील भागात दहशतवादात मोठी घट झाली होती.


लेफ्टनंट जनरल चौहान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी उत्तम युद्ध सेवा पदक, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत. ईस्टर्न कमांडची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल चौहान यांची नवी दिल्लीत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ankita Murder Case : 'रिसार्टमध्ये सुरु होती देहविक्री अन् अंमली पदार्थांचे अवैध धंदे'; हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्याचा दावा
PFI Ban: PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी