Passport Police Clearance Certificate: पासपोर्ट बनवणं ही एक वेळ खाऊ प्रक्रिया आहे, असा अनेक भारतीयांचा समज आहे. पासपोर्ट (Passport) बनवण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावं लागत. ज्यात पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification) ही देखील एक महत्वाची प्रक्रिया आहे. मात्र आता पासपोर्ट बनवू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पासपोर्ट अर्जदार सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (Police Clearance Certificate) अर्ज करू शकतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) सोमवारी सांगितले आहे.
पासोपोर्ट मिळविण्यासाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (Police Clearance Certificate) हे आवश्यक असते. अनेकदा स्थानिक पोलिसांकडून पीसीसी जारी करण्यात वेळ लागतो. ज्यामुळे पासपोर्ट मंजूर होण्यास विलंब होतो. यामुळेच परराष्ट्र मंत्रालयाने 28 सप्टेंबरपासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये (POPSKs) पीसीसी सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात म्हटलं आहे की, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (Police Clearance Certificate) अर्जदारांची लक्षणीय वाढ झाल्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मंत्रालयाने भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस (Post office) पासपोर्ट (Passport) सेवा केंद्रांना पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अर्ज करण्याच्या सुविधेसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे." या निवेदनात म्हटल्यानुसार अर्जदारांना 28 सप्टेंबरपासून याचा लाभ घेता येईल. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या पावलाचा फायदा केवळ परदेशात नोकरी शोधणाऱ्या भारतीय नागरिकांनाच होणार नाही, तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या इतर मागण्याही यामुळे पूर्ण होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Dasara Melava : दसरा मेळाव्याला ठाकरे गटाकडून मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याचं काय आहे प्लॅनिंग?
निवडणूक आयोग घटनात्मक संस्था, शिवसेना कुणाची याचा निर्णय घ्यावा; लंच ब्रेकनंतर काय युक्तीवाद झाला?