एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पासपोर्टचा नवा नियम आजपासून लागू, आता सहज मिळवता येणार पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट

Passport Police Clearance Certificate: केंद्र सरकारने नियमात बदल केल्याने पासपोर्ट बनवणं आता आणखी सोपं झालं आहे. हे नवीन नियम आजपासून म्हणजेच 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरात लागू झाले आहेत.

Passport Police Clearance Certificate: केंद्र सरकारने नियमात बदल केल्याने पासपोर्ट बनवणं आता आणखी सोपं झालं आहे. हे नवीन नियम आजपासून म्हणजेच 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरात लागू झाले आहेत. आतापर्यंत पासपोर्ट मिळवण्यासाठी अधिक वेळ हा  पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच पीसीसीच्या मंजुरीमध्ये लागत होता. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने हीच समस्या लक्षात घेऊन यावर तोडगा काढला आहे. आता  पासपोर्ट अर्जदार सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (Police Clearance Certificate) अर्ज करता येणार आहे. यामुळे अर्जदारांच्या वेळेची बचत होऊन लवकरात पासपोर्ट हे अर्जदारांना मिळणार आहे. 

पोस्ट ऑफिसद्वारे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट

आजपासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नागरिक ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांद्वारे (POPSKs) हा अर्ज करू शकतात. तत्पूर्वी याबाबत निवेदन जरी करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होत की, गेल्या काही महिन्यांपासून पासपोर्ट बनवण्यासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या (पीसीसी) मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रातून पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातच पोलिस मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया अनिवार्य आहे, कारण अर्जदाराच्या गुन्हेगारी नोंदी जर असतील तर, त्यांना पासपोर्ट मिळू देण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे.

क्लिअरन्स महत्वाचे का आहे?

तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करता तेव्हा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यासोबतच या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणीही केली जाते. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पोलिस भेट देतात आणि तिथे जाऊन तुमच्या कागदपत्रांची माहिती घेतात. याशिवाय आजूबाजूला तुमच्याबद्दल माहिती मिळवतात.

असा करा पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करा (Apply for passport online)

  • यासाठी तुम्ही पासपोर्टच्या अधिकृत वेबसाइट passportindia.gov.in ला भेट द्या.
  • जर तुम्ही User ID आणि Password तयार केला असेल तर तो टाकून लॉगिन करा, अन्यथा User ID आणि Password तयार करा.
  • नोंदणीसाठी New User वर क्लिक करा आणि  Register Now हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून कॅप्चा कोड टाका.
  • त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • पुढे तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला जवळच्या पासपोर्ट ऑफिसचे तपशील, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि लॉगिन आयडी यासारखी सर्व माहिती भरायची आहे.
  • यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून माहिती सेव्ह करा.
  • लक्षात ठेवा की रिलीझ फील्डमध्ये प्रदान केलेली माहिती योग्य असणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीमुळे फॉर्म नाकारला जाईल.
  • आता यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला (जेथे पासपोर्ट सेवा केंद्र बनवले आहे) भेट द्यावी लागेल.
  • तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या अर्जाची पावती आणि मागितलेली सर्व मूळ कागदपत्रेही ठेवावीत.
  • त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये पडताळणी आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
  • यानंतर पोलिस पडताळणीनंतर तुमचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केला जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Passport Police Clearance Certificate: पासपोर्ट बनवणं होणार आणखी सोपं, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन करता येणार अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
Embed widget