नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना लायब्ररीत घुसून झालेल्या मारहाणीचा व्हीडिओ समोर आला आहे. 15 डिसेंबर 2019 रोजी पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती. समोर आलेला व्हिडीओ ओल्ड रीडिंग हॉलमधील असल्याचं समोर येत आहे. जामिया समन्वय समितीने हा व्हीडिओ जारी केला आहे.


व्हिडिओतील दृष्यांवरुन लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. विद्यार्थी लायब्ररीत शांतपणे अभ्यास करत होते. अचानक पोलीस लायब्ररीत घुसतात आणि विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात करतात. पोलीस लायब्ररीतील सामानाचं नुकसान करतानाही दिसत आहेत. विद्यार्थी यावेळी स्वत:ला वाचवण्यासाठी पळण्याच प्रयत्न करतात. मात्र तरीही पोलीस त्यांना पळून पळून मारत असल्याचं दृष्यांमध्ये दिसत आहेत.


Jamia Protests | जामिया हिंसाचारप्रकरणी दहा जण अटकेत, एकही विद्यार्थी नाही



नव्या सीसीटीव्ही फूटेजवर प्रतिक्रिया देताना दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, हे प्रकरण सध्या क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलं आहे. समोर आलेल्या व्हिडीओची तपासणी सुरु आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.



Jamia Protests | जामिया विद्यापीठातील हिंसाचाराविरोधात प्रियंका गांधी यांच दिल्लीत धरणं आंदोलन

प्रियांका यांनी ट्विटरवर लिहिलं की, "बघा कशी दिल्ली पोलिसांनी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थांना मारहाण केली. एक विद्यार्थी पोलिसांना पुस्तक दाखवत आहे, मात्र तरीही त्याला मारहाण झाली. गृहमंत्री आणि दिल्ली पोलिसांनी खोटं सांगितलं की, लायब्ररीमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण झाली नाही." पुढे प्रियांका गांधी यांनी लिहिलं की, "हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील मारहाणीनंतर कुणावर कारवाई झाली नाही तर, सरकारच्या कारभारावर संशय निर्माण होईल."


CAA Protest : आंदोलनांच्या केंद्रस्थानी असलेल्या जामिया आणि अलीगड विद्यापीठांचा इतिहास


गेल्या वर्षी 15 डिसेंबरला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधीतील दिल्लीतील आंदोलन हिंसक झालं होतं. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती, तर सार्वजनिक बस आणि खासगी वाहनंही जाळली होती. त्यानंतर कारवाई करत दिल्ली पोलीस जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घुसले होते आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली होती.