NEET 2021 : NEET UG परीक्षा केंद्र जाहीर; असं पहा आपले परीक्षा केंद्र
NEET 2021 : NEET UG ची 12 सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेच्या केंद्रांची माहिती नीटच्या neet.nta.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.
नवी दिल्ली : द नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 12 सप्टेंबरला होणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET-UG) च्या परीक्षा केंद्राची यादी जाहीर केली आहे. एनटीएने जाहीर केलेल्या केंद्रावर नीटची परीक्षा पार पडणार आहे. NEET-UG परीक्षेसाठीच्या जाहीर करण्यात आलेल्या केंद्रांची माहिती neet.nta.nic.in. या अधिकृत वेवसाईटवर मिळेल.
या आधी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना त्यांना हव्या असलेल्या सेंटरचं सिलेक्शन केलं होतं. त्याच आधारे नीटने आता ही परीक्षा केंद्रे जाहीर केली आहेत.
प्रवेशपत्र 9 सप्टेंबरला मिळणार
NEET UG परीक्षेचे प्रवेशपत्र हे 9 सप्टेंबरला, म्हणजे परीक्षेच्या आधी तीन दिवस एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.
परीक्षा केंद्राची माहिती कशी घ्यायची?
- सर्वप्रथम NTA च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या- neet.nta.nic.in
- संकेतस्थळावर आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि पासवर्ड टाकावा.
- त्यानंतर Submit वर क्लिक करावं आणि एक्झाम सेंटर सिटी तपासावं.
NEET UG परीक्षा 13 भाषांमध्ये होणार
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा NEET UG परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
यापूर्वी कोविड साथीच्या आजारामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. परीक्षेदरम्यान, सर्व उमेदवारांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या इतर नियमांचं पालन करावं लागेल.
महत्वाच्या बातम्या :