एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

NDA Meeting : दिल्लीत NDA ची बैठक, 38 पक्ष सामील होणार, महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार

NDA Meeting : भाजपविरोधी पक्षांची बंगळुरुत आज बैठक होत असतानाच दिल्लीत भाजपप्रणित एनडीएने देखील बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

NDA Meeting : भाजपविरोधी पक्षांची बंगळुरुत आज बैठक (Opposition Meeting) होत असतानाच दिल्लीत भाजपप्रणित एनडीएने (NDA) देखील बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार आहेत. सत्तेचं केंद्र असलेल्या राजधानी दिल्लीत संध्याकाळी पाच वाजता एनडीएची बैठक होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Aji Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

बैठकीला आणखी कोण-कोण उपस्थित राहणार?

या बैठकीला भाजपचे काही जुने मित्रपक्ष सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. म्हणजे भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंह बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू देखील पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांचही नाव चर्चेत आहे. 

शक्तिप्रदर्शनात 38 पक्ष सहभागी होणार : जेपी नड्डा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांनी माहिती दिली. "ही बैठक सत्ता मिळवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी होत आहे. एनडीएच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनात 38 पक्ष सहभागी होणार आहेत. गेल्या 9 वर्षात एनडीएच्या सर्व पक्षांनी या आघाडीच्या विकासाचा अजेंडा, योजना, धोरणे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहेत, यात रस दाखवला आहे. एनडीएकडे पक्ष उत्साहाने येत आहेत," असं जेपी नड्डा म्हणाले.

1998 मध्ये 24, आता 38 मित्रपक्ष : भाजप

जेपी नड्डा म्हणाले की, "एनडीएमधून बाहेर पडलेले मित्रपक्षही भारताला मजबूत करण्यासाठी एकत्र येत आहेत आणि भाजप आपल्या विचारधारेशी कटिबद्ध आहे. काही वर्षांपूर्वी कृषी कायदे तसंच इतर मुद्द्यांमुळे मित्रपक्ष एनडीएपासून दुरावले होते." तर "एनडीएच्या मित्रपक्षांची संख्या 1998 मध्ये 24 होती. त्यात वाढ होऊन आता 38 झाली आहे. हे पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं लोकप्रियतेचं लक्षण आहे," असं पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

विरोधकांची बंगळुरुमध्ये बैठक

विरोधी पक्षांची आज बंगळुरुमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. आज बंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा

Meeting : विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस, शरद पवार राहणार उपस्थित; तर दिल्लीत NDA ची बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वरAaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget