एक्स्प्लोर

शाळेतील विद्यार्थ्यांना आता महाभारत आणि रामायणाचे पाठ मिळणार, देशभक्ती आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी NCERT पॅनेलची शिफारस

Ramayana Mahabharata In school textbooks: गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या पुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याची शिफारस केली होती.

नवी दिल्ली : मुलांमध्ये लहान वयातच स्वाभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात महाभारत आणि रामायणाच्या अभ्यासाचा समावेश करण्यात येणार आहे. एनसीईआरटीच्या (NCERT) पॅनेलने ही शिफारस केली असून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल, रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे एनसीईआरटीने शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (NCERT Panel) स्थापन केली होती. समितीने रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्याची आणि शाळांमधील वर्गखोल्यांच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस केली आहे. समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी शिफारस

इयत्ता 7 ते 12 च्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवणे महत्त्वाचे आहे यावर समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी भर दिला. ते म्हणाले की, "समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये शिकवण्यावर भर दिला आहे. आमचा विश्वास आहे की किशोरावस्थेत विद्यार्थ्यामध्ये स्वाभिमान, देशभक्ती आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान वाढतो."

'विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा अभाव'

एनसीईआरटी समितीचे अध्यक्ष सीआय इसाक म्हणाले की, देशभक्तीच्या अभावामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेतात. त्यामुळे त्यांची मूळे समजून घेऊन त्यांच्या देशाबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे गरजेचे आहे. सध्या काही शिक्षण मंडळे विद्यार्थ्यांना रामायण शिकवतात, मात्र ते मिथक म्हणून शिकवतात. जर ही महाकाव्ये विद्यार्थ्यांना शिकवली गेली नसती तर शिक्षण पद्धतीचा कोणताही उद्देश नाही आणि ती राष्ट्रसेवा ठरणार नाही. पॅनेलने इयत्ता 3 ते 12 वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्राचीन इतिहासाऐवजी 'शास्त्रीय इतिहास' समाविष्ट करण्याची आणि 'इंडिया' नाव बदलून 'भारत' करण्याची शिफारस केली होती.

NSTC अंतिम करण्याचा विचार करेल

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी अनेक शिफारसी केल्या आहेत. या शिफारशी एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांसाठी महत्त्वाचे निर्देशात्मक दस्तऐवज आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य समितीद्वारे (NSTC) जुलैमध्ये वर्गांसाठी अभ्यासक्रम, पुस्तके आणि शिक्षण सामग्री अंतिम करण्यासाठी समितीच्या शिफारशींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

पुढील सत्रात नवीन पुस्तके येऊ शकतात

अलीकडेच NSTC ने सामाजिक शास्त्रांसाठी अभ्यासक्रम आणि शिक्षक शिक्षण सामग्री विकसित करण्यासाठी एक अभ्यासक्रम क्षेत्र गट (CAG) देखील तयार केला आहे.  NCERT राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करत आहे. एनसीईआरटीची नवीन पुस्तके पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Embed widget