Goa Drugs: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात तीव्र मोहिमेमध्ये ही कारवाई करण्यात आली. यात साडेचार लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले, प्रकरणी दोन रशियन नागरिकांसह एकूण तिघांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. यात 1980 ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती रशियन महिला जलतरणपटूचाही समावेश आहे. 


एक रशियन कार्टेल अरंबोल (Arambol) आणि गोव्याच्या लगतच्या भागात सक्रियपणे कार्यरत असल्याची माहिती एनसीबी (NCB) ला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर, एका नेटवर्कच्या मदतीने पुढील तपास सुरू करण्यात आला. 


एनसीबीच्या गोवा (Goa) युनिटने गेल्या दोन आठवड्यात ही कारवाई केली. गोव्यातील अरंबोल (Arambol) आणि त्याच्या लगतच्या भागात एक रशियन ड्रग कार्टेल सक्रियपणे कार्यरत असल्याच्या माहितीच्या आधारे, एक तपास सुरू करण्यात आला. गुप्तचर माहितीनुसार, एस. वरगानोवा (S. Varganova) नावाची एक रशियन महिला परदेशी लोकांना ड्रग्ज पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली. तपास करुन मिळालेल्या माहितीवरुन 13 एप्रिलला एस. वरगानोवा (S. Varganova) हिला अरंबोल (Arambol) मधून अटक करण्यात आली. ज्यामध्ये तिच्याकडून 2.5 ग्रॅम चरस, 2 ग्रॅम मेथाम्फेटामाइन आणि 0.3 ग्रॅम एक्स्टेसी असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 


आकाश नावाच्या स्थानिक व्यक्तीची ओळख पटली. आकाश मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा भाग होता आणि एका रशियन व्यक्तीच्या निर्देशावर तो काम करत होता. आकाशवर पाळत ठेवून 28 एप्रिलला त्याला अरंबोलमधून अटक करण्यात आली.  9 LSD ब्लॉट्स, 30 ग्रॅम चरस, 1 MDMA टॅब्लेटची 28 हजारांना विक्री करत असताना त्याला पकण्यात आले.


त्याच दिवशी, म्हणजेच 28 एप्रिलला मँडरेम परिसराभोवती पाळत ठेवण्यात आली. त्यावेळी, आंद्रे (Andre) नावाच्या रशियन नागरिकाला 20 एलएसडीसह पकडण्यात आले. आंद्रेचे निवासस्थान शोधून त्याची झडती घेतली असता, 1.32 ग्रॅम वजनाचे 59 एलएसडी ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 16.49 ग्रॅम हॅश ऑइल, 210 ग्रॅम चरस, 410 ग्रॅम हॅश केक, 1.440 किलो हायड्रोपोनिक वीड (गांजा आणि मोबाइल फोन, मादक पदार्थ) असे अनेक अंमली पदार्थ सापडले. 


तपासादरम्यान, परदेशी चलने, बनावट कागदपत्रे, आयडी आणि अनेक ड्रग्स जप्त करण्यात आले. त्याच्याकडून एकूण 4 लाख 80 हजार रुपये जप्त करण्यात आले.


ताब्यात घेण्यात आलेली रशियन महिला एस. वरगानोवा (S. Varganova) ही जलतरणात 1980-ऑलिंपिक रौप्यपदक विजेती आहे, तर आंद्रे हा रशियामधील माजी पोलीस आहे. परंतु गोव्यात दीर्घकाळ किंगपिन म्हणून कार्टेलची स्थापना केली आहे.  त्याने आपले नेटवर्क पसरवण्यासाठी अनेक शहरांना भेटी दिल्या होत्या आणि रस्त्यावरील पेडलर्सचे चांगले पसरलेले नेटवर्क ते व्यवस्थापित करत होते.  पुढील तपास सुरू आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Bhiwandi Building Collaps: भिवंडीतील वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली, 50 ते 60 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती, एकाचा मृत्यू