Bhiwandi Building Collaps: भिवंडीतील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली असून या डिगाऱ्याखाली  50 ते 60 जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली असून अग्निशमन दलाकडून बचावकार्य सध्या सुरु आहे.