एक्स्प्लोर

Navjot Singh Sidhu Resign | काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा पंजाब काँग्रेसच्या प्रमुख पदाचा राजीनामा

Navjot Singh Sidhu Resign: काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

Navjot Singh Sidhu Resign: नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला. यामागे काही महत्वाची कारणे आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या राजीनाम्याला याचीही किनार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरं तर, जेव्हा पंजाबमध्ये मंत्र्यांची नावे ठरवली गेली, तेव्हा राहुल गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा करुन ठरवली होती. यात नवज्योतसिंग सिद्धू यांचा कुठेही समावेश नव्हता. पहिल्या दिवसाच्या बैठकीत त्यांना निश्चितपणे बोलावण्यात आले होते. पण, जेव्हा राहुल गांधी शिमलाहून परतले तेव्हा सिद्धू यांना बैठकीत सहभागी करण्यात आले नव्हते. दुसरं कारण असेही मानले जाते की ज्या लोकांची नावे सीएम चन्नी यांनी निवडली मग डीजीपी असो किंवा अॅडव्होकेट जनरल यामध्येही सिद्धू यांचा विचार केला गेला नाही.

माणसाच्या चारित्र्य पतनाला तडजोडीतून सुरुवात होते.. मी कधीही पंजाबच्या कल्याणाच्या भवितव्याशी तडजोड करु शकत नाही : नवज्योत सिंग सिद्धू

म्हणजेच, मंत्र्यांची नावे ठरवताना त्यांना हायकमांडने सहभागी करुन घेतलं नाही, पोर्टफोलिओ ठरवताना त्यांना विचारले गेले नाही आणि मुख्य पदांवर निवड करताना (डीजीपी आणि मुख्य सचिवांसारख्या पदांवर) सीएम सिद्धू यांच्याशी सल्लामसलत केली गेली नाही. अशा स्थितीत पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपली नाराजी हायकमांडसमोर नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.

सिद्धू नाराज असण्याची खालील कारणं सांगितली जातायेत
1. सिद्धू यांच्या विरोधाला न जुमानता राणा गुरजीत सिंग यांना मंत्री बनवणे
2. सुखजिंदर रंधावा यांना गृह विभाग देणे
3. महाधिवक्ता म्हणून एपीएस देओल यांची नियुक्ती
4. कुलजित नागरा यांना मंत्रीपद दिलं नाही
5. मंत्रिमंडळ निर्मिती आणि विभागाचे विभाजन करताना सिद्धू यांचे मत घेतले नाही.
6. मुख्यमंत्री होण्यात अपयश

कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना

पंजाबच्या (Punjab) राजकारणाने वेगळं वळण घेतलं असून कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत झालेल्या वादानंतर काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते. 

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

'आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही' असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला दिला होता. त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपण नाराज असल्याचं सांगत आपल्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचंही सांगितलं होतं.

पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेसचा चेहरा जर नवज्योतसिंह सिद्धू असतील तर त्यांच्या पराभव करण्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या आधीच स्पष्ट केलंय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget