एक्स्प्लोर

गोव्यात नौदलाचं लढाऊ विमान कोसळलं; पायलट सुखरुप

गोव्यात सरावादरम्यान नौदलाचे लढाऊ विमान कोसळलं, पायलट पॅराशूटच्या सहाय्याने वेळीच बाहेर पडल्याने थोडक्यात वाचले.

पणजी : नौदलाचे मिग 29 के फायटर जेट विमान आज सकाळी सरावा दरम्यान दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोसळून अपघात झाला. विमानाच्या इंजिनाला आग लागल्याचे लक्षात येताच विमानातील दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडले असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. दाबोळी येथील आयएनएस हंसा येथून नियमित सरावासाठी उड्डाण घेतलेल्या मिग 29 के विमानाच्या इंजिनाला आग लागल्याने विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. विमान कोसळणार असल्याची कल्पना येताच पायलट कॅ. एम. शिवखंड व लेप्ट. कमांडर दीपक यादव यांनी पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी घेतली. दोन्ही पायलट सुखरुपपणे जमीनीवर उतरले असून ते किरोकोळ जखमी झाले आहेत. संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिलेली माहिती नुसार दोन्ही पायलट सुखरूप आहेत. वेर्णा येथे औद्योगिक वसाहत आहे. तेथे अनेक कंपन्या आणि कारखाने आहेत. मात्र, विमान निर्मनुष्य ठिकाणी कोसळल्याने जीवितहानी टळली. विमान कोसळल्याचे दिसताच लोकांनी ते पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रशासनाने लागलीच अग्निशामक दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटना स्थळावर पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पॅराशूटमधून उतरलेल्या दोन्ही पायलटला स्थानिकांनी मदत करुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. नौदलाचे विमान शनिवारी नेमके कोणत्या कारणास्तव कोसळले याची चौकशी संबंधित यंत्रणोकडून केली जाईल. विमान कोसळल्यानंतर लोकांना धुराचे प्रचंड मोठे लोट येताना दिसले. यापूर्वीही घडली होती घटना - कवायतीवेळीही विमान दुर्घटना यापूर्वीच्या काळात देखील झालेल्या आहेत. मागील वर्षी 3 जानेवारीला देखील नौदलाच्या दाबोळी विमानतळावर दुपारी मिग-29 के लढाऊ विमान कोसळून अपघात झाला होता. कोसळताच विमानाने पेट घेतला. मात्र, प्रसंगावधान राखून पायलट सुखरुपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. संबंधित बातम्या - आयएनएस खांदेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल, राजनाथ सिंहांच्या हस्ते जलावतरण सैन्याबाबत मोदींची मोठी घोषणा : तिन्ही सैन्यदलांसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नेमणूक

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Protest : राहुल गांधींना अडवण्यासाठी मोठा फौजफाटा, गनिमी काव्याने भाऊ-बहीण आयोगापासून 300 मीटरवरील आकाशवाणी भवनात शिरले, दिल्लीत राडा
राहुल गांधींना अडवण्यासाठी मोठा फौजफाटा, गनिमी काव्याने भाऊ-बहीण आयोगापासून 300 मीटरवरील आकाशवाणी भवनात शिरले, दिल्लीत राडा
Delhi Protest : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक, दिल्ली दणाणली
बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक, दिल्ली दणाणली
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Embed widget