National Herald Case : प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सोनिया गांधींनी मुदतवाढ मागितली, ईडी नव्याने समन्स जारी करणार
National Herald Case : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे सोनिया गांधी 23 जून रोजी ईडीसमोर हजर होणार नाहीत.
National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 23 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार नाहीत. या संदर्भात सोनिया गांधी यांचे पत्र ईडीच्या मुख्यालयाला प्राप्त झाले आहे. लवकरच ईडी या प्रकरणी नवीन समन्स जारी करू शकते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांचे एक पत्र ईडी मुख्यालयाला प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये त्यांच्या प्रकृतीचे कारण देत 23 जून रोजी ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यापासून सूट मागिण्यात आली आहे.
सोनिया गांधी यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. असेही पत्रात सांगण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु आरोग्याच्या कारणांमुळे सध्या ईच्या मुख्यालयात हजर राहू शकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या मुख्यालयाने सोनिया गांधींच्या या पत्राला तत्वतः मान्यता दिली आहे. सोनिया गांधी यांना चौकशीसाठी कधी बोलावायचे याबाबत ईडी लवकरच निर्णय घेईल आणि त्यांना नव्याने समन्स बजावेल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
सोनिया गांधी यांना दिलेली ही दुसरी नोटीस होती. परंतु,प्रकृतीच्या कारणास्तव त्या चौकशीला हजर राहू शकल्या नाहीत. या प्रकरणी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 5 दिवसांत 54 तास चौकशी केली आहे. यावेळी राहुल गांधी यांना जवळपास 100 प्रश्न विचारण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
काय आहेत आरोप?
सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असोसिएट जर्नल लिमिटेड (एजेएल) ताब्यात घेण्यासाठी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली आणि या कंपनीमध्ये शेल कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेण्यात आले. काँग्रेसने असोसिएट जनरल लिमिटेडला 90 कोटी रुपयांचे कथित कर्ज दिल्याचा आरोप आहे. हे कर्ज काँग्रेसने यंग इंडियनला दिले होते आणि त्या आधारे असोसिएट जर्नल लिमिटेडचे बहुतांश शेअर्स सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे गेले. 90 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनने काँग्रेसला केवळ 50 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणी ईडी तपास करत आहे.