National Doctors' Day 2021 : दरवर्षी एक जुलैला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 'नॅशलन डॉक्टर्स डे' साजरा करण्यात येतोय. याच दिवशी देशातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी असते. त्यांच्या स्मरणार्थ देशभरात हा दिवस साजरा केला जातोय. आपल्या प्राणाची बाजी लावून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्सना हा आजचा दिवस समर्पित आहे. 


कोरोना काळात देशभरातल्या डॉक्टर्सनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्ण सेवा केली आणि कोट्यवधी लोकांचा जीव वाचवला. कोणीही आजारी असलं तर त्याला पहिला डॉक्टरची आठवण येते. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या लोकांना हे डॉक्टर जीवनदान देतात. आपल्या देशात तर डॉक्टर्सना देवाचे रुप समजलं जातं. त्यामुळेच त्यांचे आभार मानण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. या वर्षाची थीम ही 'Building The Future With Family Doctors' अशी आहे. 


नॅशलन डॉक्टर्स डे चा इतिहास
बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि एक महान डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांचे मानवतावादी कार्यात असलेलं योगदान लक्षात घेऊन नॅशलन डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. सर्वप्रथम 1991 साली नॅशलन डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. बीसी रॉय यांचं वैद्यकीय क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 साली झाला तर मृत्यू 1 जुलै 1962 साली झाला. त्यांना 1962 साली देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न ने गौरवण्यात आलं. 


नॅशलन डॉक्टर्स डे च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी देशभरातील डॉक्टर्संना संबोधित करणार आहेत. देशभरातील कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता या काळात डॉक्टर्सनी चांगलं काम केलं आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या काळात अविरतपणे काम केल्याने देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 


महत्वाच्या बातम्या :