National CA Day 2022 : चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) दिन (National CA Day) दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे या दिवसाचे आयोजन केले जाते. भारतातील सर्वात व्यावसायिक आणि जुनी वित्त आणि लेखा संस्था ICAI च्या योगदानासाठी हा दिवस साजरा केला जातो.
ICAI ही भारतातील लेखा व्यवसाय आणि आर्थिक लेखापरीक्षणासाठी एकमेव परवाना देणारी आणि नियामक संस्था आहे. नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) सह प्रत्येक लेखा आणि वित्त संस्थेने त्यांनी केलेल्या लेखा मानकांच्या शिफारशींचे पालन केले पाहिजे.
चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) दिनाचा इतिहास :
ICAI अस्तित्वात येण्यापूर्वी, भारतातील ब्रिटीश सरकार कंपनी कायदा वापरून खाती राखत असे. त्यानंतर ब्रिटिश सरकारने ऑडिटर्ससाठी अकाउंटन्सी डिप्लोमा कोर्स सुरू केला. ज्या लोकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला ते संपूर्ण भारतभर ऑडिटर म्हणून काम करण्यास पात्र ठरले. तथापि, 1948 मध्ये एका तज्ज्ञ समितीने त्याचे नियमन करण्यासाठी स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची सूचना करेपर्यंत भारतात अकाउंटन्सी व्यवसाय अनियंत्रित राहिला. त्यानंतर सन 1949 मध्ये सनदी लेखापाल कायदा मंजूर झाला.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ची स्थापना 1 जुलै 1949 रोजी झाली.
चार्टर्ड अकाउंटंट्स दिनाचे महत्त्व :
आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय, ICAI ही भारतातील लेखा मानकांचे नियमन करणारी सर्वात व्यावसायिक संस्था आहे.
महत्वाच्या बातम्या :