Social Media Day 2022 : सध्याच्या काळात पाहिलं तर सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच झाला आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यापासून ते अगदी मनोरंजन करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, याच सोशल मीडियामुळे व्यक्तीव्यक्तींत संवाद निर्माण झाला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक गोष्टी खूप सोप्या आणि सोयीस्कर झाल्या आहेत. याच दिनाची आठवण म्हणून आज 30 (जून) रोजी जगभरात सोशल मीडिया दिन साजरा केला जातोय. त्या निमित्ताने जाणून घेऊयात या दिनाचा इतिहास आणि महत्त्व.

  


सोशल मीडिया दिनाचा इतिहास :


जगभरात पहिल्यांदा 30 जून 2010 ला ‘जागतिक सोशल मीडिया डे’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी जगभरातील सोशल मीडियाचा प्रभाव आणि वैश्विक स्तरावरील सोशल मीडियाचा वापर यासंदर्भातील भूमिकेवर जोर देण्यासाठी जागतिक सोशल मीडिया दिन साजरा करण्यात आला होता. जगातील पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिक्सडिग्री 1997 मध्ये लाँच झाला होता. याची स्थापना अँड्र्यू वेनरिच यांनी केली होती. दरम्यान 2001 मध्ये दहा लाखाहून अधिक यूजर्स झाल्यानंतर याला बंद केले गेले.  


अगदी सुरुवातीला, फ्रेंडस्टर, मायस्पेस आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर लोक संवाद साधण्यासाठी करत होते. आजच्या वेगवान बदलत्या काळात सोशल मीडियाची माध्यमंही बदलत आहेत. तर ही बदलती माध्यमं त्याच वेगाने लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. सध्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या माध्यमांचा कोट्यवधी यूजर्स वापर करतात. तर काही वेळा चुकीची माहिती देखील या माध्यमांद्वारे पसरवली जाते.


सोशल मीडियाचे महत्त्व : 


आता बदलत्या काळानुसार इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर आणि लिंक्डइन सारखी नवीन सोशल मीडिया अॅप्लिकेशन्स सादर करण्यात आली आहेत. हे प्लॅटफॉर्म काही समान फंक्शन्स आणि काही अतिशय युनिक फंक्शन्स शेअर करतात. व्यक्ती-व्यक्तीमधील दुरावा कमी करण्यासाठी, महत्वाची माहिती वेळेत पोहोचविण्यासाठी, तसेच नातेसंबंध टिकविण्यासाठी सोशल मीडियाचा वाटा फार मोठ्या प्रमाणात आहे. 


महत्वाच्या बातम्या :