एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CCTV : मेट्रोचा ट्रॅक ओलांडणारा तरुण थोडक्यात बचावला!
जलद आणि सोप्या प्रवासासाठी देशातील विविध शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरु होत आहेत. बुलेट ट्रेनची स्वप्नही आपण पाहत आहोत. मात्र भारतीयांच्या सवयी काही बदलण्याचं नाव घेत नाहीत, हेच या घटनेतून समोर आलं आहे.
नवी दिल्ली : रुळावर उतरुन प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. दिल्लीतील शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. मेट्रोच्या पायलटने वेळीच ब्रेक दाबल्याने 21 वर्षीय तरुण मयूर पटेलचे प्राण वाचले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
मयूर पटेलने रेल्वे स्टेशनप्रमाणेच मेट्रो ट्रेनचाही रुळ ओलांडला. पण दुसऱ्या बाजूच्या फ्लॅटफॉर्मवर मेट्रो निघण्याची वेळ झाली होती. मयूर रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर जाणार इतक्यात मेट्रो सुरु झाली. पण ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने मेट्रो थांबवली आणि अपघात टळला.
मेट्रो कर्मचाऱ्यांनी मयूर पटेलची चौकशी केली असता तो म्हणाला की, एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या फ्लॅटफॉर्मवर कसं जायचं हे मला माहित नव्हतं. त्यामुळे रुळावर उतरुन प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून दंड वसून करुन सोडण्यात आलं.
मेट्रो ट्रॅकवर उतरणं किंवा चालणं हा दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणी दोषी व्यक्तीकडून दंड वसूल केला जातो. तसंच सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. मध्ये सरकते जिन्यांची सोय असतानाही लोक अशा पद्दतीनं रुळ का ओलांडतात, हा प्रश्न समजण्यापलीकडचा आहे.. जलद आणि सोप्या प्रवासासाठी देशातील विविध शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरु होत आहेत. बुलेट ट्रेनची स्वप्नही आपण पाहत आहोत. मात्र भारतीयांच्या सवयी काही बदलण्याचं नाव घेत नाहीत, हेच या घटनेतून समोर आलं आहे.#CCTV Delhi: Narrow escape for 21 year old Mayur Patel as train moved while he was crossing the track at Shastri Nagar metro station. He was later fined by authorities. During questioning he claimed that he did not know how to get to the other platform so he crossed the track pic.twitter.com/YbXcXPzYyA
— ANI (@ANI) May 23, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement