एक्स्प्लोर
योग म्हणजे शून्य बजेटचा आरोग्यविमा : नरेंद्र मोदी
चंदिगड : आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजारो नागरिकांच्या उपस्थित योग केला. यावेळी योगाची महती सांगताना 'योग म्हणजे शून्य बजेटचा आरोग्यविमा' असल्याचं मोदी म्हणाले.
ज्याप्रमाणे मोबाईल फोनला कवटाळून बसता, तसं योगाला आपलंसं करा, असं आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केलं. योगाला कर्मकांडाशी जोडू नका आणि त्याला वादात ओढू नका अशी विनंतीही मोदींनी केली. योग परलोकाचं विज्ञान नसून इहलोकात मनःशांती कशी मिळेल, हे सांगणारं विज्ञान असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
- संयुक्त राष्ट्रांतर्फे अनेक दिवसांची घोषणा केली जाते, मात्र योग दिवस हा एकमेव दिवस जन आंदोलन झाला आहे.
- योग हा आपल्या पूर्वजांचा वारसा, योगासन म्हणजे जीवन जगण्याची पद्धत
- योग परलोकाचं विज्ञान नसून इहलोकात मनःशांती कशी मिळेल, हे सांगणारं विज्ञान
- अनेकांना योगाची महती समजलेली नाही, योगामुळे काय मिळणार यापेक्षा, काय सुटणार हे महत्त्वाचं योग हा कुठली गोष्ट मिळवण्याचा नव्हे, शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्याचा मार्ग
- योग म्हणजे शून्य बजेटचा आरोग्यविमा
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि परदेशात योगचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी दोन पुरस्कारही घोषित केले.
देशभरात योगदिनाचा उत्साह, चंदीगडमध्ये मोदींचा योग
पाहा फोटो :
चंदिगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योग
योगगुरु रामदेव बाबा यांचा फरिदाबादमध्ये योग
आंतरराष्ट्रीय योगदिनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद
योगदिनानिमित्त सुदर्शन पटनाईक यांचं वाळूशिल्प
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement