एक्स्प्लोर

Murlidhar Mohol : देशात दुग्ध क्रांतीचे नवे पर्व, 'श्वेत क्रांती 2.0' अंतर्गत 75 हजार नव्या सहकारी संस्थांचे उद्दिष्ट: मुरलीधर मोहोळ

'श्वेत क्रांती 2.0'द्वारे 75 हजार नव्या बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था (एम-पॅक्स) स्थापन करण्यात येणार आहेत, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

नवी दिल्ली : "सहकाराच्या माध्यमातून देशात 'श्वेत क्रांती 2.0'द्वारे देशातील दुग्ध क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे. या योजनेअंतर्गत देशात 75 हजार नव्या बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था (एम-पॅक्स) स्थापन करण्यात येणार आहेत; तर महाराष्ट्रात 2029 पर्यंत जवळपास अडीच हजार नव्या दूध सहकारी समित्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे," अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत दिली. 

खासदार सीमा द्विवेदी यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी या योजनेचा आराखडा व प्रगती सादर केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देईल. त्यातून रोजगार-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी व महिला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील," असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. 

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ''श्वेत क्रांती 2.0' देशाची दूध उत्पादन क्षमता दररोज 660 लाख किलोग्रामवरून एक हजार लाख किलोग्रामपर्यंत वाढविण्यावर सक्रिय काम केले जात आहे. देशात आतापर्यंत २२ हजार बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था स्थापन झाल्या आहेत. त्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत असंघटित क्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून दूधाचा योग्य दर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या योजनेत महिला सक्षमीकरणावर विशेष भर आहे. प्रारूप उपविधींमध्ये बदल करून सहकारी संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत महिला व अनुसूचित-जाती जमातीच्या घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले आहे." 

महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद

"राज्यात सध्या 12 हजार 600 दूध सहकारी समित्या कार्यरत आहेत. येत्या चार वर्षांत अडीच हजार नव्या समित्या स्थापन करण्यात येतील, तसेच 4 हजार 200 कार्यरत समित्यांचे सक्षमीकरण केले जाईल. याशिवाय देशातील सर्व राज्यांमध्ये नव्या दूध सहकारी समित्या स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे," असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

दूध संस्थांना मिळणार अर्थसाह्य

"नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट (NPDD) अंतर्गत नव्या व सध्या कार्यरत असलेल्या सहकारी संस्था व समित्यांना दूध संकलन व परीक्षणासाठी उपयुक्त यंत्रसामग्री व उपकरणे देण्यात येत आहेत. त्यासाठी जवळपास एक लाख 86 हजार रुपयांचे अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येत आहे," असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

"भारतीय शेतकऱ्यांच्या अपार कष्टामुळेच भारत जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश झाला आहे. शेती क्षेत्राच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) पशुधनाचा वाटा 25 टक्के असून, 'सहकारातून समृद्धी' या संकल्पनेतून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.", असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं.  

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget