एक्स्प्लोर

Pune Municipal Corporation: अखेर टीकेनंतर पुणे पालिकेचा तो निर्णय मागे; मुरलीधर मोहोळांकडून कार्यक्रम रद्द करण्याची सूचना, नेमकं काय प्रकरण?

Pune Municipal Corporation: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली होती. त्यानंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर विमान लँडिंग दरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात होऊन मोठा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) अजितदादांचे चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अजित पवार यांच्या निधनाला अद्याप दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) एक अजब निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. (Pune Municipal Corporation) पुणे महापालिकेचा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता सर्व स्तारातून झालेल्या टीकेनंतर हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे महापालिका प्रशासनावर टीका होत होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली होती. त्यानंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती.

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन

पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणं कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात होता. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली होती. हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी  रद्द करण्याची सूचना केली होती. त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेने काढलेल्या निर्णयात नेमकं काय? 

कामगार कल्याण विभाग, 
पुणे महानगरपालिका. 
जावक क्र. एलओ / 8006 दिनांक : 03/02) 202E

विषय - दिनांक 15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिन पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे आयोजित कार्यक्रम

पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे दि.15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त अधिकारी/सेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नृत्य (वैयक्तिक व समुहनृत्य), नाटक, ऑर्केस्ट्रा (हिंदी व मराठी गितांचा कार्यक्रम), वादन, वैयक्तिक कलागुण व छायाचित्र / हस्तचित्र/ कलाकृती प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी, ज्या अधिकारी/सेवकांना वर नमूद केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी दिनांक 10/02/2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपली नावे कामगार कल्याण विभागाकडे खालील तक्त्यामध्ये पाठवावित. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget