INS Vagsheer :  भारताची सागरी ताकद आणखी वाढली आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत लवकरच आयएनएस वागशीर ही पाणबुडी दाखल होणार आहे. या पाणबुडीच्या माध्यमातून सागरी सीमांचे संरक्षण होणार आहे.  आयएनएस वागशीर ही पाणबुडी 20 एप्रिल रोजी समुद्रात उतरणार  आहे.  प्रोजेक्ट-75 अंतर्गत भारतीय सेवेत दाखल होणारी ही सहावी पाणबुडी आहे. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.


 20 एप्रिल नंतर आयएनएस वागशीरच्या एक वर्ष सागरी चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ती भारतीय नौदलात दाखल होणार आहे. आयएनएस ही पाणबुडी स्कॉर्पीन कलावरी वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहे. 


आयएनएस वागशीरमध्ये अनेक प्रकारची शस्त्रे देखील समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शत्रूंच्या योजना फोल ठरू शकणार आहेत. कमी आवाजात शत्रूची सहज दिशाभूल करण्याची क्षमता असलेल्या आयएनएस वागशीरमध्ये 18 टॉर्पेडो वाहून नेण्याची क्षमता आहे. या पाणबुडीतून एकाच वेळी सहा टॉर्पेडो डागता येतात. शिवाय जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची या पाणबुडीची खासियत आहे. ही पाणबुडी 50 दिवस पाण्यात राहू शकते. 


आयएनएस वागशीर या पाणबुडीचे अंतर्गत तंत्रज्ञान फ्रेंच आणि एका स्पॅनिश कंपनीने तयार केले असून बांधकाम भारतीय शैलीत करण्यात आले आहे. प्रकल्प-75 अंतर्गत भारताच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत पाच अत्याधुनिक पाणबुड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याच प्रकल्पांतर्गत 20 एप्रिल रोजी आयएनएस वागशीरची निर्मिती करण्यात आली आहे. भारताची लढाऊ क्षमता वाढवणारी ही या प्रकल्पातील शेवटची पाणबुडी आहे.आयएनएस वागशीर ही पाणबुडी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि क्षमतेने सुसज्ज आहे. त्यामुळे भारताची सागरी ताकद आणखी वाढली आहे.  


महत्वाच्या बातम्या


काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाची सांगता; 2.60 कोटी सदस्य नोंदणी


दहशतवाद्यांकडून भाजप समर्थक सरपंचाची हत्या, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील घटना   


काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दलावर पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या महिलेला अटक, 'या' दहशतवादी संघटनेशी आहे संबंध