Independence Day 2022 : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील 91 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक गौर हरी दास (Gour Hari Das) यांची संघर्षमय कहाणी  सांगणार आहोत. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याबरोबर जवळून काम केले आहे. पण, दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना स्वतःला "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून सिद्ध करण्यासाठी 32 वर्ष संघर्ष करावा लागला. काय आहे गौर हरी दास यांची कहाणी..जाणून घ्या. 


32 वर्षांचा संघर्ष : 


गौर हरी दास हे मूळचे ओरिसाचे असून, गेल्या चार ते पाच दशकांपासून आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात. सेनानी गौर हरी दास सांगतात की, माझ्या मुलाला पूर्वीच्या स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने स्वत:ला स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्याचा त्यांचा लढा सुरू झाला. त्याच वर्षी त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करायचं ठरवलं. गौर हरी दास मूळचे ओरिसाचे असल्याने त्यांनी ओडिशातच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यामुळेच महाराष्ट्र सरकार इतर राज्यांतील माजी स्वातंत्र्यसैनिकांना मदत करत नाही, असे त्यांना अनेकदा ऐकायला मिळाले. आणि मग या कामासाठी ते तब्बल 32 वर्ष जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत फिरत राहिले. अखेर 32 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 2008 साली त्यांना माजी स्वातंत्र्यसैनिक असल्याचा दाखला मिळाला.


महात्मा गांधींची मुलाखत


महात्मा गांधींसोबतच्या त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या भेटीची आठवण करून देत गौर हरी दास सांगतात की, "मी बापूंना भेटलो तेव्हा मी अवघ्या 14 वर्षांचा असावा. बापूंनी माझ्या कामाचे कौतुक केले. मी वयाच्या 16 व्या वर्षी देश स्वतंत्र झाला. पण, मी ठरवले की मी माझे जीवन महात्मा गांधींच्या विचारांवर पुढे जाणार आहे. 


वानर सेना काय होती? 


आम्ही "वानार सेना" म्हणून काम करायचो. स्वातंत्र्यसैनिकांची पत्रे त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविणे आणि कुटुंबाकडून मिळालेली पत्रे त्या स्वातंत्र्यसैनिकांना परत करणे हे आमचे काम होते. आम्ही एका स्वातंत्र्यसैनिकाचे पत्र दुसऱ्या स्वातंत्र्यसैनिकालाही पाठवायचो. पत्रांची देवाणघेवाण करताना गोपनीयतेची काळजी घ्यावी लागायची. 


तुरुंगातील दिवस 


गौर हरी दास तुरुंगातील दिवसाबद्दल बोलताना म्हणाले की, "तिरंगा ध्वज फडकवल्याबद्दल मला एकूण 46 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आम्ही राजकीय कैदी असल्यामुळे आम्हाला सामान्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले होते. तुरुंगात असताना एक दिवस जेवण वाटपावरून दोन गटात मारामारी झाली, जी नंतर पोलिसांनी शांत केली."


ओरिसा ते बिहार प्रवास (आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत काम)


ओरिसात बरीच वर्ष काम केल्यानंतर मला वाटले की, देशासाठी काम करायचे असेल तर ओरिसाच्या बाहेर काम करावे. म्हणूनच मी ओरिसातून बिहारला गेलो. तिथे मला आचार्य विनोबा भावे भेटले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी होऊन मी जवळपास एक वर्ष बिहारमध्ये काम केले.


महत्वाच्या बातम्या :