Flag Hosting : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट रोजी (उद्या) आपण आपला 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) साजरा करणार आहोत. या अमृत महोत्सव वर्षानिमित्त संपू्र्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्याच्या या दिनानिमित्त उद्या लाल किल्ल्यापाून ते सरकारी इमारती, शाळा, महाविद्यालये आणि अन्य ठिकाणी ध्वजाराेहण करण्यात येईल. अशा वेळी ध्वजारोहणाशी संबंधित काही नियम आणि कायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. हे नियम कोणते ते जाणून घ्या. 
 
 ध्वजारोहणाचा नियम काय सांगतो?



  • तिरंगा हाताने कातलेल्या सूती, रेशीम किंवा खादीच्या कापडाचा असावा. त्याची लांबी-रुंदी गुणोत्तर 3:2 असावी.

  • अशोक चक्राचे कोणतेही निश्चित मोजमाप नाही. त्यात फक्त 24 आरे असावेत.

  • ध्वज कधीही अर्ध्यावर फडकावू नये. आदेशाशिवाय तिरंगा अर्ध्यावर फडकवता येत नाही.

  • कोणालाही सलाम करण्यासाठी तिरंगा खाली करता येणार नाही.

  • तिरंग्यात कोणतेही चित्र, पेंटिंग किंवा छायाचित्रे वापरू नयेत.

  • राष्ट्रध्वजाची छेडछाड होता कामा नये. ते फाटलेले किंवा चिखलाचे नसावे.

  • कागदाचा तिरंगा वापरल्यानंतर तो निर्जन ठिकाणी ठेवावा. कारण ध्वज वापरल्यानंतर तो कचरा किंवा रस्त्यावर फेकून देणे अपमानकारक मानले जाते.

  • यापूर्वी फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिरंगा फडकवण्याची परवानगी होती. आता 'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत सरकारने 20 जुलै 2022 रोजी कायद्यात सुधारणा करून यावेळी कधीही तिरंगा फडकवण्याची परवानगी दिली आहे. आता ध्वज 24 तास फडकवता येणार आहे.

  • तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

  • तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये. जर एखादी व्यक्ती कमरेच्या खाली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही.


महत्वाच्या बातम्या :