Azadi Ka Amrit Mahotsav : आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील अनेक राज्यात तिरंगा रॅली देखील काढण्यात येत आहे. उद्या देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीकडून  'हर हाथ तिरंगा' कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय खास असणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.


स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम आदमी पक्षाच्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.  हा कार्यक्रम अतिशय खास असल्याची माहिती आम आदमी पार्टीने दिली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. त्यागराज स्टेडियमवर आज खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही उपस्थित राहणार आहेत.


केजरीवाल नेमकं काय म्हणाले 


तिरंगा आमची आन, बान, शान आणि जान असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले. ट्वीट करत त्यांनी असे म्हटलं आहे. आजपासून घरोघरी तिरंगा मोहीम सुरु होत आहे. तुम्हीही अभिमानाने तुमच्या घरी तिरंगा लावा. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 5 वाजता आपण सर्वजण हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गाऊ आणि भारताला जगातील नंबर-1 देश बनवण्याची शपथ घेऊ. त्यावेळी प्रत्येकाच्या हातात तिरंगा असेल असेही केजरीवाल म्हणाले.


काय म्हणाले मनीष सिसोदिया


तिरंगा फडकताना प्रत्येकालाच अभिमान वाटतो. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला भारताला जगात प्रथम क्रमांकाचा देश बनवण्याचा संकल्प करायचा असल्याचे मनीष सिसोदिया म्हणाले. आज सायंकाळी 5 वाजता या उत्सवात सामील व्हा असे आवाहन देखील यावेळी मनीष सिसोदिया
यांनी केलं आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री  मनीष सिसोदिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले आहे.


25 लाख तिरंग्यांचे वाटप 


राजधानी दिल्लीच 100 ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. दिल्ली सरकारने 'हर हाथ तिरंगा' मोहिमेअंतर्गत नागरिकांना 25 लाख तिरंग्याचे वाटप करण्यात आले आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्लीत 500 तिरंगे फडकवण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: