एक्स्प्लोर
Advertisement
भाजपचा विजय व्हावा, नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत, मुलायम सिंहांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
मुलायम यांच्या या अचानक पवित्र्यानंतर काही काळ त्याही गोंधळून गेल्या होत्या. मुलायम सिंह हे एक ज्येष्ठ समाजवादी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मुखातून पहिल्यांदाच आलेली मोदीस्तुती चर्चेचा विषय ठरली आहे.
नवी दिल्ली : आगामी निवडणुकीतही भाजपचाच विजय होऊ दे आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनावेत अशा शुभेच्छा चक्क मुलायम सिंह यादव यांनी आज नरेंद्र मोदींना संसदेत दिल्या. एवढेच नाही तर आगामी निवडणुकीत आमचे फार उमेदवार निवडून येणार नाहीत, असंही विधान मुलायम सिंह यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे सगळ्या विरोधी पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज सोळाव्या लोकसभेच्या अखेरच्या दिनी भाषण करताना मुलायम सिंह यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. यावेळी मुलायम यांच्या शेजारीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी बसल्या होत्या. मुलायम यांच्या या अचानक पवित्र्यानंतर काही काळ त्याही गोंधळून गेल्या होत्या. मुलायम सिंह हे एक ज्येष्ठ समाजवादी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मुखातून पहिल्यांदाच आलेली मोदीस्तुती चर्चेचा विषय ठरली आहे.
मुलायम सिंह यादव यांनी आधी मोदींना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व सदस्य निवडून यावे, अशी प्रार्थना मी करतो. मात्र सध्या आमची संख्या कमी आहे. यावर सभागृहातील खासदारांना हसू आवरता आले नाही. यावेळी मोदींनीही हात जोडून यादव यांचे आभार मानले.
मोदींनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांना घेऊन पुढे जाण्याचे प्रयत्न केले आणि यात त्यांना यशही आले, असे त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज व्यवस्थित पार पडावे, यासाठी मेहनत घेतली आणि यासाठीच मी त्यांचा देखील आभारी आहे, असे मुलायम सिंहांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement