एक्स्प्लोर

ना फ्रान्स ना इटली, आकाश अंबानीचं लग्न 'या' मंदिरात?

हिमालयाच्या गिरीशिखरांमध्ये वसलेल्या रुद्रप्रयागमधल्या त्रियुगी नारायण मंदिरात मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश आणि श्लोका मेहता यांचा विवाह होणार आहे

मुंबई : त्रियुगी नारायण मंदिर... इथे शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे इथे झालेली लग्नं सात जन्म टिकतात, अशी भक्तांची धारणा आहे. हिमालयाच्या गिरीशिखरांमध्ये वसलेल्या त्याच रुद्रप्रयागमधल्या त्रियुगी नारायण मंदिरात होणार आहे आशियातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मोठ्या मुलाचं लग्न. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता याच मंदिरामध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. पण प्रश्न असा आहे, की आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचं लग्न अशा कडेकपारीतल्या छोट्याशा गावातल्या एका लहानशा मंदिरात का होत आहे? खरं तर अंबानी यांच्या मुलाचं लग्न एखाद्या प्रायव्हेट बीचवर किंवा एखाद्या प्रायव्हेट हिल स्टेशनवरही करता आलं असतं. देशातलंच काय, परदेशातलं सर्वात महागडं हॉटेलही अंबानी सहज बुक करु शकतात. पण तसं न करता अंबानी यांनी हेच मंदिर का निवडलं? अनंत अंबानी आणि राधिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल हिंदू मान्यतेनुसार, त्रियुगी नारायण मंदिराच्या जवळच असलेल्या गौरीकुंडामध्ये तपश्चर्या करुन पार्वतीनं भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं. त्यानंतर या दोघांचा विवाहसोहळा याच त्रियुगी नारायण मंदिरात पार पडला. या मंदिरात असलेला अग्नी हा तीन युगांपासून विझलेला नाही. त्रेता युग, द्वापार युग आणि कलियुगातही हा अग्नी अखंड तेवत आहे, असं मानलं जातं. याच अग्नीला साक्षी मानून शंकर आणि पार्वती लग्नबंधनात अडकले. या लग्नात पार्वतीचे बंधू म्हणून भगवान नारायण यांनी व्यवस्था पाहिली, तर भगवान ब्रह्मांनी या लग्नाचं पौरोहित्य केल्याचीही आख्यायिका आहे. इथे लग्न करणाऱ्या दाम्पत्याचं लग्न हे यशस्वी होतं, अशीही धारणा आहे. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत जुलै महिन्यात आकाशचा साखरपुडा झाला होता. या सोहळ्याला राजकारणी, उद्योगपती, क्रिकेट स्टार्स तसेच ख्यातनाम बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली. उत्तराखंड सरकारनेही या मंदिराला वेडिंग डेस्टिनेशनचा दर्जा दिला आहे. आतापर्यंत अभिनेत्री कविता कौशिक, उत्तराखंडचे माजी मंत्री धनसिंह रावत आणि आयएएस अपर्णा रावत यांचीही लग्नं इथेच झाली आहेत. मुळात हे वेडिंग डेस्टिनेशन अत्यंत छोटं असल्यानं या लग्नात अगदी मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित केलं जाणार आहे. अंबानींसारख्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न आपल्या राज्यात होत असल्यानं उत्तराखंड सरकारचीही धांदल उडाली आहे. समुद्रसपाटीपासून 9 हजार फूट उंचीवर होणारा हा विवाहसोहळा, तितक्याच उंचीचा ठरेल यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget