By-Election Result 2020 LIVE : गुजरात विधानसभा पोटनिवडणूकीत सर्व आठ जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर

By Poll 2020 Results LIVE Updates, Vote Counting देशातील 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या. आज बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Nov 2020 06:21 PM
मध्य प्रदेशमध्ये आतार्यंत भाजपचा पाच जागी विजय, तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा
उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूकीत 7 जागांपैकी 6 जागांवर भारतीय जनता पार्टी आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप 20, काँग्रेस सात आणि बसपा एका जागेवर आघाडीवर आहे.
गुजरात विधानसभा पोटनिवडणूकीत सर्व आठ जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. अशातच आज दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे.
मध्यप्रदेश पोट निवडणुकीकडे देखील देशाचे लक्ष लागून आहे. 28 जागांसाठी निवडणूक झाली होती. निवडणूक आयोगाने 28 पैकी 28 जागांचे कल जारी केले आहेत. यात काँग्रेसला आठ जागांवर आघाडी आहे. तर भाजपनं 19 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळं भाजप म्हणजेच शिवराज सरकार मजबूत होण्याकडे वाटचाल करत आहेत. एका जागेवर बीएसपी आघाडीवर असल्याची माहिती आहे.
झारखंडमधील दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तीन टप्प्यातील मतमोजणी पूर्ण, बेरमोमध्ये भाजपचे योगेश्वर महतो आणि दुमकामध्ये भाजपचे लुईस मरांडी यांनी आघाडी घेतली आहे.

मध्य प्रदेश पोटनिवडणूक : आतापर्यंतच्या कलांमध्ये 17 जागांवर आघाडी, या निकालानं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी निकाल पाहात असतानाची काही छायाचित्र देखील शेअर केली आहेत. राज्याच्या जनतेनं एकदा पुन्हा विकास आणि जनकल्याणासाठी संकल्प केलेल्या भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी सोपवली आहे.
मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर पार पडलेल्या पोट निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. आता भाजपने 17 जागांवर आघाडी घेतली आहे.

मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर पार पडलेल्या पोट निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. आता भाजपने 17 जागांवर आघाडी घेतली आहे.
छत्तीसगढ विधानसभेच्या एका जागेवर सुरु असलेल्या पोट निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. नागालँडच्या दक्षिण अंगामी-1 आणि पुंगरो किफिरे विधानसभेच्या जागांवर सध्या पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. हाती आलेल्या कलांनुसार, अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकींच्या सुरुवातीच्या कलांमध्ये सातपैकी पाच जागांवर भाजप, एका जागेवर सपा आणि एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. घाटमपूरमध्ये भाजपच्या उपेंद्र नाथ पासवान यांना बसपाच्या कुलदीप शंखवार यांनी मागे टाकलं आहे. पहिल्या फेरीत कुलदीप शंखवार यांना 1341, भाजपचे उपेंद्र नाथ 1169, समाजवादी पार्टीचे इंद्रजीत कोरी यांना 950 आणि काँग्रेसच्या कृपाशंकर यांना 263 मतं मिळाली आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार मोरेना, सुमौली, दिमानी, अम्बाह, मेहगांव, गोहड, ब्यावरा आणि हाट पिपिलया विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. तर सुवासरा, सांवेर, बदनावर, नेपानगर, मांधाता, आगर, सांची, अनूपपुर, मल्हारा, सुरखी, मुंगौली, अशोक नगर बमूरी, ग्वालियर, ग्वालियर ईस्ट जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीत 28 पैकी 20 जागांचे कल हाती, सरकार टिकवण्यासाठी भाजपला 28 पैकी 8 जागा जिंकणं गरजेचं
मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत 28 पैकी 19 जागांचे कल समोर, भाजप 13 तर काँग्रेस पाच जागांवर पुढे
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीचा निकाल मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारचं भविष्य ठरवणार आहेत. तर मध्य प्रदेशातील 25 जागांवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
मणिपूर विधानसभा पोट निवडणूकीच्या 5 जागांपैकी एका जागेवर काँग्रेस पार्टी आघाडीवर आहे. कर्नाटकच्या दोन विधानसभा जागांवर भाजप आघाडीवर आहे.

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकांच्या 28 जागांपैकी 2 जागांवर भाजप आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जागांवर पार पडलेल्या पोट निवडणूकांचे निकाल आज जारी केले जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरात विधानसभा पोटनिवडणूकीत 8 जागांपैकी 2 जागांवर भारतीय जनता पार्टी पुढे आहे. तर उत्तर प्रदेशात दोन जागांवर भाजप तर एका जागेवर समाजवादी पार्टी पुढे आहे. कर्नाटक पोटनिवडणूकीत आर. आर. नगर विधानसभा जागांवर भाजप पुढे आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील सात विधानसभा जागांपैकी एका जागेवर समाजवादी पार्टी पुढे आहे. निवडणूक आयोगाने इतर जागांचे कल अद्याप जारी केलेले नाहीत.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीचा निकाल मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारचं भविष्य ठरवणार आहेत. तर मध्य प्रदेशातील 25 जागांवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. सध्याच्या निवडणूकीसाठी पूर्वीचे काँग्रेस आमदार आता भाजपकडून निवडणूक लढत आहेत. तर उरलेल्या तीन जागांवर निवडून आलेल्या आमदारांचं निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी पोट निवडणूका घेण्यात येत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 230 सदस्यांच्या विधानसभेच्या 28 जागांसाठी एकत्रच पोटनिवडणूका घेतल्या जात आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभेत बहुमत असणारा भाजप सात जागांवर पोट निवडणूकीच प्रतिष्ठेची लढाई लढत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर आठ जागांवर पोट निवडणुका

घेण्यात येणार आहेत. यांपैकी 5 आमदार भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढत आहेत. याव्यतिरिक्त छत्तीसगढ (एक जागा), हरियाणा (एका जागा), झारखंड (दोन जागा), कर्नाटक (दोन

जागा), नागालँड (दोन जागा), ओदिशा (दोन जागा) आणि तेलंगणा (एक जागा) वर पोट निवडणूक लढत आहे. 7 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील 4 आणि बिहार वाल्मिकी नगर लोकसभा जागांवर

मतदान पार पडलं. या सर्व जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं.
देशातील 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या होत्या. आज बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

पार्श्वभूमी

By Poll 2020 Results LIVE Updates, Vote Counting| देशातील 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या. आज बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीचा निकास मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारचं भविष्य ठरवणार आहेत.


 


उत्तर प्रदेश विधानसभेत बहुमत असणारा भाजप सात जागांवर पोट निवडणूकीच प्रतिष्ठेची लढाई लढत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर आठ जागांवर पोट निवडणुका घेण्यात येणार आहेत. यांपैकी 5 आमदार भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढत आहेत. याव्यतिरिक्त छत्तीसगढ (एक जागा), हरियाणा (एका जागा), झारखंड (दोन जागा), कर्नाटक (दोन जागा), नागालँड (दोन जागा), ओदिशा (दोन जागा) आणि तेलंगणा (एक जागा) वर पोट निवडणूक लढत आहे. 7 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील 4 आणि बिहार वाल्मिकी नगर लोकसभा जागांवर मतदान पार पडलं. या सर्व जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं.



मध्य प्रदेश : जोरा, सुमौली, मुरेना, दिमनी, अंबाह, मेहगांव, गोहद, ग्वालियर, ग्वालियर पूर्व, डबरा, भांडेर, करेडा, पोहरी, बमोरी, अशोक नगर, मुंगोली, सुरखी, मल्हारा, अनूपपुर, सांची, बियोरा, आगर, हाटपिपलिया, मंधाता, नेपानगर, बदनवर, सांवेर आणि सुवासरा
उत्तर प्रदेश : उन्नाव की बांगरमऊ, अमरोहा की नोगांव सादात, फिरोजाबाद मधील टूंडला, बुलन्दशहर की सदर, जौनपूर मधील मल्हनी, कानपुर देहात मधील घाटमपूर आणि देवरिया सदर. बांगरमऊ जागेसाठी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांचं सदस्यत्वाचा कालावधी संपल्यानंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

गुजरात : अब्दसा, लिमडी, मोरबी, धारी, गढा (एसटी), कर्जन, डांग्स (एसटी) आणि कपराडा (एसटी)

कर्नाटक : सिरा, राजा राजेश्वरी नगर

ओडिशा : बालासोर, तीर्थोल

झारखंड : दुमका, बेरमो

नगालँड : दक्षिणी अंगामी- I, पुंग्रो-किफिर

तेलंगाना : दुब्बाका

छत्तीसगढ : मरवाही

हरियाणा : बडोदा

मणिपूर : थुबल जिल्ह्यातील लिलोंग आणि वांगजिंग-टेन्था, कंगपोकपी मधील सेतु आणि इम्फाल वेस्ट मधील वंगोई विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे.

बिहारमधील वाल्मिकी नगर येथील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.