नवी दिल्ली : आगामी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (MP Election 2023) भाजप (BJP) कडून उमेदवारांची दुसरी यादी (MP BJP Candidates List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 39 नावांचा समावेश आहे. वर्षाच्या शेवटी मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) निवडणुकीची (MP Election 2023) रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. मध्यप्रदेश मोठं राज्य असल्याने भाजपने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीमध्ये नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, रीती पाठक, प्रल्हाद पटेल या मोठ्या नावांचादेखील समावेश आहे. 25 सप्टेंबर (सोमवार) रोजी पंतप्रधान मोदी यांनी भोपाळचा दौराही केला होता, यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

3 केंद्रीय मंत्र्यासह 6 खासदारांना विधानसभेचं तिकीट

भाजपने खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं आहे. भाजपने मुरेनाच्या दिमानी मतदारसंघातून नरेंद्र सिंह तोमर, सतनामधून गणेश सिंह, जबलपूर पश्चिममधून राकेश सिंह, गदरवारामधून खासदार उदय प्रताप सिंह, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल आणि निवास मतदारसंघातून फग्गन सिंह कुलस्ते यांना विधानसभेचं तिकिटे देण्यात आलं आहे. त्यासोबतच भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूरमधून विधानसभा उमेदवारी दिली आहे. देपालपूरमधून मनोज पटेल आणि छिंदवाडामधून बंटी साहू यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

मध्यप्रदेशातून दुसऱ्या यादीमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमची झलक पाहायला मिळत आहे. भाजपने सहा महिलांनाही उमेदवारी दिली आहे. सिधीमधून रीती पाठक यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यादीमध्ये डबरा येथून माजी मंत्री इमरती देवी, परासियामधून ज्योती डेहरिया आणि गंगाबाई उईके यांची नावे सामील आहेत.

मध्यप्रदेशसाठी भाजपची दुसरी यादी

विधानसभेचे नाव उमेदवाराचे नाव
श्योपुर दुर्गालाल विजय
मुरैना रघुराज कंसाना
दिमनी     नरेंद्र सिंह तोमर
लहर    अमरीश शर्मा गुड्डू
भितरवार     मोहन सिंह राठौड
डबरा इमरती देवी
सेवढा प्रदीप अग्रवाल
करैरा रमेश खटीक
राघौगड हिरेंद्र सिंह बंटी
देवरी ब्रिजबिहारी पटेरिया
राजनगर अरविंद पटेरिया
सतना गणेश सिंह
मैहर श्रीकांत चतुर्वेदी
सीधी रीती पाठक
सिंहावल विश्वामित्र पाठक
कोतमा दिलीप जैस्वाल
जबलपूर पश्चिम राकेश सिंह
डिंडौरी पंकज टेकाम
निवास फग्गन सिंह कुलस्ते
कटंगी गौरव पारधी
नरसिंगपूर प्रल्हाद सिंह पटेल
गदरवाडा उदय प्रताप सिंंह
जुन्नरदेव नथन शाह
छिंदवाडा विवेक बंटी साहू
परासिया ज्योती डेहरिया
घोडाडोंगरी गंगाबई उईके
उदयपूर नरेंद्र शिवाजी पटेल
खिलचीपूर हजारी लाल दांगी
आगर मधु गेहलोत
शाजापूर अरुण भीमावत
भीकनगाव नंदा ब्राह्मणे
राजपूर अंतर सिंह पटेल
पानसेमल श्याम बर्डे
थंडला कलसिंह भावर
गंधवानी सरदार सिंह मेड़ा
देपालपूर मनोज पटेल
इंदौर-1 कैलाश विजयवर्गीय
नागदा-खाचरौद डॉ. तेजबहादुर सिंह
सैलाना संगीता चारेल

महत्वाच्या इतर बातम्या :

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री शिवराज सिंहांचे नाव वगळले?