नवी दिल्ली: मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी (MP & Chhattisgarh Assembly Election) भाजपने आपली पहिली 60 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केली आहे. गुरूवारी रात्री उशीरा यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत मध्यप्रदेशच्या 39 आणि छत्तीसगडच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव नाही. निवडणूक आयोगाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मध्यप्रदेश (Madhya Pradesh BJP Candidate List 2023) आणि छत्तीसगड (chhattisgarh BJP Candidate List 2023) विधानसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्याअगोदर दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या निवडणुकांवर चर्चा करण्यात आली होती.
मध्यप्रदेशात भाजपने सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथील जागेसाठी सुरेंद्र सिंह गहरवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपचे सरचिटणीस ओमप्रकाश धुर्वे यांना शाहपुरा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गोहद येथून लाल सिंह आर्य यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आहे. तर काँग्रेस विरोधी पक्ष आहे. 2018 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता.त्यानंतर भाजपचे 109 आमदार निवडून आले, तर काँग्रेसचे 114 आमदार निवडून आले होते. दीड वर्षांतच कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. शेवटी मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य यांनी 22 आमदारांसहीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपाचे शिवराजसिंह चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
तर छत्तीसगडच्या यादीबद्दल बोलायचे झाले तर भाजपने जाहीर केलेल्या 21 उमेदवारांच्या यादीत पाच महिलांना संधी दिली आहे. बस्तर येथून मनीराम कश्यप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रेमनगर येथून भूलन सिंह मरावी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अभनापूर येथून इंद्रकुमार साहू, खैरागड येथून विक्रांत सिंह, कांकेर येथून आशारम नेता यांना संधी तिकिट देण्यात आले आहे.
हे ही वाचा :