एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरुणाची मारहाण
भाजप आमदार यशपाल सिंह सिसोदिया प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्या कानशिलात लगावली.
भोपाळ : मध्यप्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहेत. सगळे पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत सुटलेत. मध्य प्रदेशात गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आश्वासने देणाऱ्या भाजपच्या विद्यमान आमदार व मंत्र्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. असाच एका प्रसंग भाजपचे मंदसौर येथील आमदार यशपाल सिंह सिसोदिया यांच्यासोबत घडला आहे. प्रचारादरम्यान झालेल्या वादादरम्यान एका तरुणाने यशपाल सिंह यांच्या कानशिलात लगावली.
गेल्या दहा वर्षांपासून यशपाल सिंह सिसोदिया मंदसौरमध्ये आमदार आहेत. काल मंदसौरमधील अलावदाखेडी गावात ते प्रचाराला गेले होते. त्यावेळी एका युवकाने सिसेदिया यांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. सिसोदिया यांना भाजपने तिसऱ्यांदा मंदसौर येथून विधानसभेचे तिकिट दिले आहे. यावेळी सिसोदिया यांचा मुकाबला काँग्रेसचे नेते नरेंद्र नाहटा यांच्याशी होणार आहे.
दरम्यान सिसोदिया यांना थोबाडित मारणाऱ्या तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, मानसिक संतुलन ठिक नसल्यामुळे या तरुणावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सिसोदिया यांनी त्या तरुणाविरोधात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement