देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. Monsoon Update : प्रतीक्षा संपली! पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज


Weather Update : पावसाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह आनंदाची बातमी आहे. मान्सूनची (Monsoon Update) प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे उकाड्यापासूनही लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये (Kerala Rain Update) उद्या मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 


2. Cyclone Biporjoy : 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा वाढता धोका! पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता


Biporjoy Cyclone Update : एकीकडे पावसाची (Monsoon Update) प्रतिक्षा लागली असताना दुसरीकडे आता चक्रीवादळाचा (Cyclone) धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनही लांबला आहे. बिपरजॉय (Biporjoy) चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं आता चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आलं असून हे वेगाने उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. देशात या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर 


3. हत्या करून तुकडे मिक्सरमध्ये! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, मीरा रोडमधील थरकाप उडवणारी घटना


Mira Road Crime News: मिरा रोडमध्ये (Mira Road) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे. वाचा सविस्तर 


4. Gpay : खुशखबर! आता 'आधार कार्ड'ने करा UPI पेमेंट, गुगल पे वापरण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही


Google Pay Aadhaar Authentication UPI : गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. आता युपीआय (UPI) पेमेंट करणं आणखी सोपं झालं आहे. गुगल पे युजर्ससाठी आता UPI पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता नाही. तुम्ही आधार कार्डच्या मदतीने UPI पेमेंट करू शकता. त्यामुळे आता यूपीआय ॲक्टिव्ह करण्यासाठी युजर्संना डेबिट कार्डची गरज नाही. युजर्स त्याच्या आधार क्रमांक वापर करून UPI ​​पेमेंट नोंदणी (Registration) करता येते. वाचा सविस्तर 


5. India vs Australia WTC final 2023: ज्याची भीती होती तेच झालं... कांगारूंचा हुकमी एक्का टीम इंडियावर भारी, दुसऱ्या दिवसाच्या खेळावर सर्वांची नजर


India vs Australia WTC final 2023 Day 2: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा (ICC World Test Championship Finals) अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात बुधवारपासून (7 जून) लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जात आहे. आज (8 जून) कसोटी सामन्याचा दुसरा दिवस असेल आणि ऑस्ट्रेलियन संघ 3 विकेट्सवर 327 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात करेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. वाचा सविस्तर 


6. Odisha Train Accident: पन्नास-100 वेळा नाहीतर, वर्षभरात 51 हजार वेळा रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड


Odisha Train Accident: ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने  (Odisha Train Accident) सगळ्यांचा धक्का बसला आहे. रेल्वे खात्यातही या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ओडिशात अपघात झालेल्या ठिकाणी इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये (Malfunction in Interlocking System) बिघाड असल्याचा अहवाल सादर केला होता. या अहवालाला पुष्टी देणारी एक घटनादेखील घडली होती. ओडिशा रेल्वे अपघाताच्या सुरुवातीच्या तपासात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये (Electronic Interlocking System) बिघाड असल्याची माहिती समोर आली. तर, दुसरीकडे रेल्वेच्या कारभारावर चिंता व्यक्त करणारी आकडेवारीदेखील समोर आली आहे. मागील वर्षभरात देशभरात तब्बल 51 हजार वेळेस सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर 


7. 8th June in History: जागतिक ब्रेन ट्यूमर दिन, लोकमान्यांनी ‘गीतारहस्य' ग्रंथांचे लेखन पूर्ण केले, अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि शिल्पा शेट्टीचा जन्म; आज इतिहासात...


8th June in History: जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. आज जागतिक ब्रेन ट्यूमर दिन, जागतिक महासागर दिन आहे. इतिहासात आजच्या दिवशी टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. तर, प्रख्यात अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि शिल्पा शेट्टीचा जन्म देखील आजच्या दिवशी झाला. चला तर मग जाणून घेऊयात 8 जूनचे इतरही दिनविशेष. वाचा सविस्तर 


8. Mrug Nakshatra 2023 : आज सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश, याच मुहूर्तावर होते पावसाची सुरुवात; वाचा रंजक माहिती


Mrug Nakshatra 2023 : हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. ‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही अत्यंत मजेशीर आणि तितकीच संशोधनात्मक बाब आहे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात. प्रत्त्येक नक्षत्राचे विशिष्ट वाहन असते यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती हा संपन्नतेचे प्रतीक मानला जातो. वाचा सविस्तर 


9. Horoscope Today 08 June 2023 : मेष, तूळ, मकरसह 'या' राशींवर असेल लक्ष्मीची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य


Horoscope Today 08 June 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तर, वृषभ राशीचे लोक काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखतील. मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य. वाचा सविस्तर