देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


 मान्सून संदर्भात महत्वाचं अपडेट; पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण, भारतीय हवामान विभागाची माहिती


पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.  मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला. तेव्हापासून मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला असून, त्याचा वेगही मंदावला  होता. (वाचा सविस्तर) 


 तीन देशांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात, संसदेच्या नव्या इमरातीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर म्हणाले... 


तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले. पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी केलं मोदींचं स्वागत  केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिथल्या सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांनीही भारताचा सत्कार केला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  (वाचा सविस्तर)


लांब रांगा, गर्दी नकोच... आता FASTag नं भरा पार्किंग शुल्क; रोख रक्कम, UPI चीही गरज नाही 


 जर आम्ही सांगितलं की, आता फास्टॅगचा वापर कार पार्किंगचे चार्जेस भरण्यासाठीही करता येणार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल? नाही ना. पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. कारण आता कार पार्किंगचे पैसे (Parking Charges) फास्टॅगमधून भरणं शक्य होणार आहे.  (वाचा सविस्तर)


अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज, जम्मू काश्मीरच्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द


अत्यंत खडतर असलेल्या अमरनाथ यात्रेला ( Amarnath Yatra ) दरवर्षी हजारो भाविक जात असतात.  यंदा यात्रेला 1 जुलै महिन्यत सुरूवात होणार आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या  19 जूनपासून सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. (वाचा सविस्तर)


 2000 ची नोट देणाऱ्या ग्राहकांना परत पाठवू नका, CIPD चे पेट्रोल पंप डीलर्सना आवाहन 


 जे ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी येतात आणि त्यांनी जर दोन हजार रुपयांची नोट दिली तर त्या ग्राहकाला माघारी पाठवू नका असं आवाहन कंसोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स (CIPD) या संस्थेने देशातील सर्व पेट्रोल-डिझेल डिलर्सना केलं आहे. (वाचा सविस्तर)


पंतप्रधान मोदींना BOSS म्हणणं, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भाषणाचा भाग नव्हताच... एस. जयशंकर यांनी सांगितला किस्सा 


 पंतप्रधान मोदींसोबत या परदेश दौऱ्यावर जाणं हे त्यांचं भाग्य होतं. जग आज भारताकडे आदरानं पाहत आहे, ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळेच, असंही ते म्हणाले. मोदींच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींना Boss म्हणून संबोधल्याची. याबाबतचा किस्साही यावेळी जयशंकर यांनी सांगितला.  (वाचा सविस्तर)


Horoscope Today 25 May 2023 : आजचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य


 आज मेष राशीच्या लोकांना वेळेत नोकरीची कामे पूर्ण करतील. तर, वृषभ राशीच्या लोकांसाठी अभ्यासासाठी चांगला काळ आहे. धनु राशीच्या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असेल. आजचा गुरुवार मेष ते मीन राशीसाठी कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)


शिवरायांच्या डरकाळीने औरंगजेबाचा दरबार दणाणला, मग दगाबाजीने राजांना आग्र्यात नजरकैदेत टाकलं; आज इतिहासात 


मराठ्यांच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी इतिहासात स्वराज्यावर सर्वात मोठं संकट आलं होतं. आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेलेल्या शिवाजी महाराजांनी दगाबाजीने अटक करण्यात आली. तसेच आजच्या दिवशी क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्म झाला होता. यासह इतिहासातील इतर महत्त्वाच्या जाणून घेऊया (वाचा सविस्तर)