PM Modi Returned From Three Nation Visit: सहा दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले. पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी केलं मोदींचं स्वागत  केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिथल्या सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांनीही भारताचा सत्कार केला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


संसदेच्या नव्या इमरातीच्या उद्घाटनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिथल्या सत्ताधारी आणि विरोधक,या दोघांनीही भारताचा सत्कार केला असं मोदी म्हणाले. भारताबद्दल बोलताना गुलामीच्या मानसिकतेत बुडून जाता कामा नये, असंही ते पुढे म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  मी जगातील देशांमध्ये जातो तेथे जगातील अनेक सामर्थ्यवान व्यक्तींना भेटतो. त्यावेळी मी नव्या भारताच्या क्षमतेबद्दल बोलतो. माझ्या देशाच्या महान संस्कृतीचा गौरव करताना मी ताठ मानेने बोलतो. हे सगळं करण्याचे सामार्थ्य माझ्यामध्ये आहे कारण तुम्ही बहुमताचे सरकार बनवले आहे. जेव्हा मी जगभरात जातो त्यावेळी मी 140 कोटी  भारतीय नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. 






कोरोना लसीवरून विरोधकांवर निशाणा 


परदेशात लस धाडल्यामुळे मोदी सरकारला सातत्याने टीकाही सहन करावी लागली आहे. यावर पहिल्यांदाच भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले. परदेशात लस पाठवल्यामुळे अनेकांनी टीका केली. परंतु ही महात्मा गांधी आणि गौतम बौद्धांची भूमी आहे. पापुआ न्यू गिनी येथील नागरिकांनी माझी भाषा समजली नाही. परंतु त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. भारताने लस पाठवली म्हणून आज आम्ही जिवंत असल्याची भावना तेथील नागरिकांची होती.


ब्रिटन दौऱ्यावेळी शाकाहरी जेवण


दरम्यान पंतप्राधन नरेंद्र मोदींनी त्यांच्या ब्रिटन दौऱ्यावेळी महाराणी एलिझाबेथ यांच्या भेटीची एक आठवण सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराणी एलिझाबेथने माझ्यासाठी खास शाकाहरी जेवण बनवल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे असणारा एक रुमाल मला दाखवला आणि म्हणाल्या, ज्यावेळी माझे लग्न झाले त्यावेळी हा रूमाल मला महात्मा गांधींनी दिला होता. जगभरात भारताला मिळणारे हे प्रेम मी विसरू शकत नाही.  


हे ही वाचा :


PM Modi Sydney Speech: क्रिकेटच्या मैदानापासून ते योग, जिलेबी चाटपर्यंत; पीएम मोदींची ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये जोरदार फटकेबाजी