Monsoon Update : पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला. तेव्हापासून मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला असून, त्याचा वेगही मंदावला होता. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. तर 7 जूननंतर मान्सून गतीनं पुढे सरकणार असल्याची अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे.
मान्सूनचे आगमन चार दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे. तर केरळात 7 जूननंतर मुसळधार पावसाचा स्कायमेटने इशारा दिला आहे. तर मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. वायव्य भारतात 30 मे पर्यंत अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे.
महाराष्ट्रात 9 जून तर मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन
वेगारीस ऑफ द वेदरकडून (Vagaries of the Weather) केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे.
यंदा मान्सून कसा? स्कायमेट आणि आयएमडीचा वेगवेगळा अंदाज
स्कायमेटकडून (Skymet Monsoon Forecast) यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो.
राज्यातील कमाल तापमानात घट होणार, हवामान खात्याचा अंदाज
उकाडयापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन दिवसांत चार ते सहा अंशांपर्यंत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे मुंबई आणि उपनगरांनाही उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तर पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा :