देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. Weather Updates: देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे, तर काही भागात पावसाचा इशारा 


Weather Updates: या महिन्याच्या सुरुवातीला देशातील काही राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) चांगलीच हजेरी लावली. त्यामुळं थंडी जाणवत होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसात देशातील अनेक राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. येत्या काही दिवसात तापमानात तीन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही राज्यात पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. वाचा सविस्तर


2. पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर; 4400 कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार


PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरात (Gujrat) दौऱ्यावर असणार आहेत. सुमारे 4,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत 19,000 लाभार्थ्यांना घरांचं वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (आज) गुजरातला भेट देणार आहेत. वाचा सविस्तर 


3. Same Sex Marriage: समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता प्रकरणावरील सुनावणी पूर्ण; सुप्रीम कोर्टाकडून निकाल राखीव


Same Sex Marriage:  सुप्रीम कोर्टात  समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्याच्या मागणीवरील याचिकेची सुनावणी आज पूर्ण झाली. घटनापीठाने आज निकाल राखीव ठेवला असल्याचे सांगितले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस रविंद्र भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पीएस नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर याची सुनावणी झाली. जवळपास 20 याचिकांवरील सुनावणी पूर्ण करण्यात आली. वाचा सविस्तर 


4. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची सुटका, आज इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश


Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अखेर सुटका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवली असून तातडीने सोडण्याचे आदेश दिलेत. या निकालामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. मंगळवारी इम्रान खान यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोठडीत आपल्याला एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे वागणूक दिली, लाठ्या काठ्याने मारहाण केली, असे आरोप त्यांनी कोर्टात केले.  आज सकाळी 11.30 वाजता इस्लामाबाद हायकोर्टात हजर राहणार आहेत. वाचा सविस्तर 


5. Agriculture News : फळबाग उत्पादकांसाठी बिहार सरकारचा मोठा निर्णय, अनुदानासह मिळणार मोफत रोपे  


Agriculture News : देशात शेती क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती क्षेत्रात प्रगती साधली जात आहे. तसेच सध्या शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं नवीन पिकांची लागवड करत आहेत. सध्या फळबागांच्या (Orchard) क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. फळबागांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकारनं (Bihar Government) दिलासा दिला आहे. फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकार मोफत रोपे देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे. वाचा सविस्तर 


6. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप दिग्दर्शकाच्या भूमिकेत; आगामी Modi चित्रपटावर सुरूये काम


Hollywood Actor Johnny Depp Announces Modi Biopic: हॉलिवूड (Hollywood) अभिनेता जॉनी डेप (Hollywood Actor Johnny Depp) गेल्या वर्षी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डसोबतच्या (Amber Heard) घटस्फोटाच्या खटल्यामुळे चर्चेत होता. या प्रकरणाचा मात्र त्याच्या कारकिर्दीवर खोलवर परिणाम झाला. त्याला फॅन्टास्टिक बीट्समधून (Fantastic Beats) काढून टाकण्यात आलं. पायरेट्स ऑफ द कॅरिबियनमध्येही (Pirates of The Caribbean) त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता डेपच्या नवीन प्रोजेक्टबद्दल एक मोठं अपडेट समोर आलं आहे. पण डेप आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये कॅमेऱ्यासमोर काम करताना दिसणार नाही तर तो कॅमेऱ्यामागे असणार आहे. डेपनं 1997 मध्ये द ब्रेव्ह नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर थेट आता तो 'मोदी' (Modi) नावाचा चित्रपट बनवणार आहे. वाचा सविस्तर 


7. 12th May In History : शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यामध्ये दाखल, चीनमधील भूकंपात 87 हजार लोकांचा जीव गेला; आज इतिहासात


12th May In History  : मराठ्यांच्या इतिहासात आग्र्याहून सुटका ही घटना सुवर्ण अक्षरातून लिहिली गेली आहे. औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे 12 मे 1666 रोजी आग्र्याला पोहोचले आणि पुढील इतिहास घडला. तर चीनच्या इतिहासात आजचा दिवस हा काळा दिवस असल्यासारखा आहे, कारण 12 मे 2008 रोजी चीनमध्ये भूकंप झाला आणि जवळपास 87 हजार लोकांचा मृत्यू झाला, तर चार लाख लोक जखमी झाले. या भूकंपामुळे हजारो लोक बेपत्ता झाले आणि लाखो लोक बेघर झाले. या भूकंपामध्ये चीनच्या अगणित मालमत्तेचं नुकसान झालं. जाणून घेऊया आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घटना... वाचा सविस्तर 


8. Horoscope Today 12 May 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य


Horoscope Today 12 May 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या खालील संधी मिळतील. मेष ते मीन राशीसाठी शुक्रवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर