देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार; आयोगाची आज पत्रकार परिषद


नवी दिल्ली:  मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज  दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जरी  ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) सेमीफायनलच आहे. वाचा सविस्तर 


कुणाला घड्याळ? कुणाला काटा? राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी, तर शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव


Maharashtra NCP Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील (Maharashtra News) जनतेनं पुन्हा एकदा अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. अजित पवारांनी उचललेल्या पावलानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दोन गटांत विभागली गेली. एक राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गट आणि दुसरा अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा गट. त्यामुळे शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडानंतर अनुभवलेल्या सर्व गोष्टी महाराष्ट्र पुन्हा अनुभवतोय. अशातच प्रश्न पडतोय की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? याप्रकरणी आज दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत. एक शरद पवार गटानं दाखल केलेली अजित पवार गटाविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिका आणि दुसरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगातही आज सुनावणी पार पडणारा आहे. वाचा सविस्तर 


Weather Update : पुढील 48 तासांत परतीच्या पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह 'या' राज्यांत पावसाचा अंदाज


Weather Update Today : आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Moonson Withdrawl) इशारा देण्यात आला आहे. राज्यासह देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. देशातील पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. येत्या काही दिवसांत देशातून मान्सून पूर्णपणे माघारा घेईल. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आज देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित भागात हवामान निरभ्र राहील. वाचा सविस्तर 


Anil Ambani: कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींच्या अडचणींमध्ये वाढ, DGGI कडून कंपनीला 922 कोटींची जीएसटी नोटिस


GST Notice to Anil Ambani Company: अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या रिलायन्स कॅपिटलची (Reliance Capital) उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सला (Reliance General Insurance) जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (Directorate General of GST Intelligence) नं 922.58 कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डीजीजीआयनं कंपनीला नोटिस पाठवून उत्पन्नावर कोट्यवधी रुपयांच्या जीएसटीची (GST) मागणी केली आहे. DGGI नं कंपनीला 478.84 कोटी रुपये, 359.70 कोटी रुपये, 78.66 कोटी रुपये आणि पुनर्विमा आणि सह-विमा यासारख्या सेवांमधून मिळालेल्या महसुलावर 5.38 कोटी रुपयांच्या जीएसटीची मागणी करणाऱ्या चार नोटिस पाठवल्या आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, कंपनीला ही रक्कम लवकरात लवकर द्यावी लागेल. वाचा सविस्तर


ISRO Gaganyaan : इस्रोच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेबाबत मोठी अपडेट, 'या' महिन्याच्या शेवटी अबॉर्ट टेस्ट


ISRO Gaganyaan Module Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजे इस्रो (ISRO) पहिल्या मानवी मोहिमेसाठी सज्ज आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या (Moon Mission) यशानंतर आता गगनयान मोहिमेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इस्रोच्या महत्वाकांक्षी गगनयान (Gaganyaan) मोहिमेची तयारी सुरु असून या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. गगनयान मोहिमेसाठीची महत्वाची चाचणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. वाचा सविस्तर


Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानच्या शक्तिशाली भूकंपात 2445 जणांचा मृत्यू, आकडा आणखी वाढण्याची भीती


Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा आता आणखी वाढला आहे. तालिबान सरकार (Taliban Government) च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामधील मृतांचा आकडा 2000 च्या पुढे गेला आहे. रॉयटर्सतच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान भूकंपामुळे 2445 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर 


Nushrratt Bharuccha : इस्त्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरूप भारतात परतली; म्हणाली,"मला थोडा वेळ..."


Nushrratt Bharuccha : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine Escalation) युद्ध सुरू आहे.  या युद्धामुळे बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्त्रायलमध्ये अडकली होती. त्यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करत होते. पण आता अभिनेत्री सुखरूप भारतात परतली आहे. मुंबई विमानतळावर ती स्पॉट झाली आहे. वाचा सविस्तर 


9 October In History : समाजसुधारक लोकहितवादी, बसपाचे संस्थापक काशीरांम यांचे निधन, अभिनेते राजकुमार यांचा जन्म; आज इतिहासात...


9 October In History :  आजचा दिवस भारतीय समाजकारण, राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि इतिहासलेखक गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतीदिन आहे. त्याशिवाय, उत्तर भारतात दलितांच्या राजकीय चळवळीला एका उंचीवर नेणारे बहुजन समाजाचे संस्थापक कांशीराम यांचाही स्मृतीदिन आहे. अभिनेते राजकुमार यांचा आज जन्मदिन आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Today 9 october 2023: आजचा सोमवार 'या' राशींसाठी शुभ! काही राशींना अडचणींचा सामना करावा लागेल, राशीभविष्य


Horoscope Today 9 october 2023 : सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. याशिवाय गजकेसरी योग आणि आश्लेषा नक्षत्राचा प्रभावही राहील. ग्रह आणि नक्षत्रातील या बदलामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी धनात वाढ होण्याची शुभ शक्यता आहे आणि धनु राशीचे लोक धार्मिक विधींमध्ये उत्साहाने सहभागी होतील. मिथुन राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. जाणून घ्या, आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा राहील. आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर