देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! महाराष्ट्रासह 'या' राज्यांना अवकाळी पावसाचा धोका; IMD चा अंदाज


Today Weather IMD Update : देशात सध्या हिवाळ्यात (Winter) पावसाळा (Rain) अनुभवायला मिळत आहे. उत्तर भारत आणि मध्य भारतात (Cold Wave) सध्या तापमानात कमालीची घट (Temperature Drops) झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आज अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण भारतात थंडीची लाट (Cold Weather) पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यासह देशात 5 जानेवारीपर्यंत काही राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला (Rain Prediction) मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 5 ते 11 जानेवारी दरम्यान बहुतेक राज्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे... वाचा सविस्तर 


चांदा ते बांदा, पेट्रोलचा वांदा! संप मागे, पण काही ठिकाणी इंधन पुरवठा सुरळीत होण्यास विलंब; राज्यात कुठे काय परिस्थिती?


Truck Driver Strike : केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. हिट अँड रन (Hit and Run) प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तूर्तास लागू होणार नाहीत, असं आश्वासन केंद्रीय गृह खात्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळं ट्रक मालकांच्या संघटनेकडून ट्रक आणि टँकरचालकांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता ट्रक आणि तुमच्या गाड्या चालवा, असं आवाहन मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे... वाचा सविस्तर 


Petrol-Diesel Price: मालवाहतूकदारांचा संप मागे, पण इंधन पुरवठा सुरळीत होण्यास काही ठिकाणी विलंब; आज पेट्रोल-डिझेलचे दर काय?


Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel Rates) जाहीर केले आहेत. 3 जानेवारीसाठी पेट्रोल (Petrol Rate) आणि डिझेलचे दर (Diesel Price) जाहीर करण्यात आले आहेत. आज 3 जानेवारीलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत बदल करण्यात आलेला नाही. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत बदल केला जाऊ शकतो, असे संकेत सरकारकडून दिले जात आहेत. तरी अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही... वाचा सविस्तर 


Sana Khan Case: मोठी बातमी! सना खान प्रकरणाला नवं वळण? आरोपीच्या घरातून मोबाईन अन् लॅपटॉप जप्त


Sana Khan Murder Case : नागपूर : राज्यासह (Maharashtra News) संपूर्ण देश हादरवणाऱ्या नागपुरातील (Nagpur Crime News) सना खान हत्या प्रकरणी (Sana Khan Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपच्या (BJP) अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणी एक मोबाईल फोन (Mobile) आणि एक लॅपटॉप (Laptop) जप्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. जबलपूरमधून (Jabalpur) जप्त झालेले ते मोबाईल सना खान यांचेच असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे... वाचा सविस्तर 


Ira Khan Nupur Shikhare Wedding : लग्न घटिका समीप आली! आमिर खानची लेक आज अडकणार लग्नबंधनात; 900 पाहुणे, सेलिब्रिटी अन् बरचं काही


Ira Khan Nupur Shikhare Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक इरा (Ira Khan) आज बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकणार आहे. 900 पाहुणे आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे... वाचा सविस्तर 


3rd January In History : सावित्रीबाई फुले यांची जयंती,अंतराळ संशोधक सतीश धवन यांचा स्मृती दिन; आज इतिहासात...


3 rd January In History : अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 3 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्याशिवाय, भारतीय अंतराळ संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ सतीश धवन यांचा स्मृती दिन आहे... वाचा सविस्तर 


Horoscope Today 3 January 2024 : आजचा बुधवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 3 January 2024 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 3 जानेवारी 2024, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, कर्क राशीच्या लोकांनी आज विद्युत उपकरणांपासून थोडे लांब राहावे, अन्यथा विजेचा धक्का बसू शकतो. तूळ राशीच्या लोकांनी सावध राहावे, आजचा दिवस सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी चांगला असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर