Ira Khan Nupur Shikhare Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक इरा (Ira Khan) आज बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकणार आहे. 900 पाहुणे आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
इरा खान आणि नुपुर शिखरे यांचा लग्नसोहळा मुंबईतील ताज लँड्समध्ये होणार आहे. महाराष्ट्रीयन आणि रजिस्टर पद्धतीने त्यांचं लग्न होणार आहे. लग्नानंतर एका खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या लग्नाला 900 पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
इराच्या लग्नाचं सलमानला खास आमंत्रण
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, इरा आणि नुपुर यांच्या लग्नसोहळ्याला खान आणि शिखरे यांच्या कुटुंबातील जवळचे मंडळी उपस्थित असणार आहेत. 13 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या रिसेप्शन पार्टीलादेखील मोठ्या संख्येने सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. सायरा बानो आणि सलमान खान यांच्या घराबाहेर इरा आणि नुपुरला स्पॉट करण्यात आलं आहे.
नुपुर शिखरे कोण आहे?
नुपुर शिखरेचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला आहे. नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. नुपुर आणि इराची पहिली भेट 2020 मध्ये झाली होती. पण 2022 मध्ये नुपुरने इराला लग्नासाठी प्रपोज केलं. अखेर काही दिवसांनी फोटो शेअर करत नुपुरने त्यांचं नातं अधिकृत केलं.
नुरुरबद्दल न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला होता,"इराने निवड केलेल्या मुलाचं नाव नुपुर शिखरे आहे. आम्ही त्याला पोपॉय म्हणून हाक मारतो. नुपुर खूपच प्रेमळ आहे. इराच्या कठीण काळात नुपुर तिच्या पाठीशी होता. नुपुर आणि इरा एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत".
आमिरची लेक इरा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. इरा आणि नुपुर यांचा साखरपुडा मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इटलीमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी खास पार्टीचं आयोजन करत सर्वांसोबत आपला आनंद शेअर केला होता. या पार्टीत आमिरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासह अभिनेत्री फातिमा सना शेखसह जवळचे कुटुंबिय उपस्थित होते.
संबंधित बातम्या