Chandrayaan 3 Rover Update: चांद्रयान 3 यशानंतर आता त्या ठिकाणी उतरलेले प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) अपडेट्स येत आहेत. इस्त्रोने याबाबतचा लेटेस्ट व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये शिवशक्ती पॉईंटवर चांद्रयानचे रोव्हर फिरताना दिसत आहे. भारताच्या चांद्रयान 3 ने बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं आणि इतिहास घडवला होता.
चंद्रावर चांद्रयान-3 च्या लँडिंग ठिकाणाचे नाव 'शिवशक्ती' पॉइंट असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, 26 ऑगस्ट रोजी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमसोबत झालेल्या भेटीदरम्यान घोषणा केली होती.
प्रज्ञान रोव्हरचा व्हिडीओ जारी करताना इस्रोने ट्विट केले की, प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील रहस्यांच्या शोधात शिवशक्ती पॉइंटभोवती फिरत आहे.
इस्रोने दिले लेटेस्ट अपडेट
चांद्रयान-३ मोहिमेतील तीन उद्दिष्टांपैकी दोन उद्दिष्टे साध्य झाली आहेत, तर तिसर्या उद्दिष्टांतर्गत वैज्ञानिक प्रयोग सुरू असल्याचेही अवकाश संस्थेने सांगितले. त्यात म्हटले आहे की चांद्रयान-3 मिशनचे सर्व पेलोड सामान्यपणे काम करत आहेत.
इस्रोने सांगितले की, चांद्रयान-3 मोहिमेच्या तीन उद्दिष्टांपैकी चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे काम पूर्ण झाले आहे. चंद्रावर रोव्हर हलवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तिसऱ्या उद्दिष्टांतर्गत वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत.
23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अवकाश दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इस्त्रोला भेट देऊन शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं. ते म्हणाले की, चंद्राच्या पृष्ठभागावर 2019 मध्ये ज्या ठिकाणी चांद्रयान-2 ने आपल्या पावलांचे ठसे सोडले ते ठिकाण तिरंगा पॉइंट म्हणून ओळखले जाईल. यासोबतच 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल.
चांद्रयान-3 मोहिमेचे लँडर 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. लँडिंगनंतर काही तासांनी प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर आला. यासह चंद्राच्या या भागात पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
ही बातमी वाचा: