देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


फडणवीसांच्या हस्ते महापूजा! चारवेळा आषाढीला अन् दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी; तर विरोधामुळे एकदा निवासस्थानीच केली पूजा


पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हस्ते आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. तर, दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर 


Uttarkashi Tunnel Update: उरलं फक्त 10 मीटरचं अंतर! उत्तरकाशीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विघ्न


Uttarkashi Rescue Operation: उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तर काशीमध्ये (Uttarkashi) 41 जणांना वाचवण्यासाठी सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, बोगदा खोदणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीहून हेलिकॉप्टरद्वारे 7 तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे. काही तांत्रिक बिघाड दूर करुन कोणत्याही परिस्थिती आजच बचावकार्य पूर्ण केलं जाईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 


Maharashtra Weather: राज्यात आजपासून 4-5 दिवस पावसाची शक्यता, मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट, इतर भागातील स्थिती जाणून घ्या


Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला (Maharashtra) पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, आजपासून राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) पावसाची शक्यता आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. वाचा सविस्तर 


चीननं पुन्हा धाकधूक वाढवली, कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक, WHO नं मागितला अहवाल


China Pneumonia Update: कोरोनाच्या (Corona Virus Updates) उद्रेकाचं केंद्रबिदू ठरलेल्या चीननं संपूर्ण जगाची धाकधूक पुन्हा एकदा वाढवली आहे. चीनमध्ये (China) पुन्हा एकदा एका रहस्यमयी आजारानं हैदोस घातला आहे. या रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत बोलताना चीननं सांगितलं आहे की, चीनमधील अनेक लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझा सारखे आजार पसरत आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, चिनी रुग्णालयांमध्ये अनेक आजारी लहान मुलं दाखल झाली आहे. सर्व लहान मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. WHO नं सांगितलं की, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर 


IPL Transfer Window 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन? रोहित शर्माही बदलणार IPL संघ; ट्रान्सफर विंडो अन् नियम काय?


IPL Transfer Window 2024: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) रणसंग्रामाची सांगता झाली आहे. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं (Australian Cricket Team) भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावलं. टीम इंडियाच्या (Team India) तोंडचा घास ऑसी संघानं हिरावून घेतला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. केवळ टीम इंडियाच्याच नाहीतर, तब्बल 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचाही चक्काचूर ऑसी संघानं केला. आता या दुःखातून सावरुन भारतीय क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) नव्या हंगामाची आतुरतेनं वाट पाहू लागले आहेत. वाचा सविस्तर 


23 November In History : भारतीय औद्योगिकीकरणाचे शिल्पकार वालचंद हिराचंद यांचा जन्म; आज इतिहासात


23 November In History : इतिहासात नोंदवलेल्या प्रत्येक तारखेप्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी देखील अनेक घटनांची नोंद आहे.  या तारखेच्या बहुतांश घटना दुःखद घडल्या आहेत. भारताच्या औद्योगिकरणाचे प्रमुख शिल्पकार असलेले उद्योजक वालचंद हिराचंद (Walchand Hirachand Doshi) यांचा आज जन्मदिन आहे. भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ सर डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा (Sir Jagadish Chandra Bose) आज स्मृतीदिन आहे.  वाचा सविस्तर 


Horoscope Today 23 November 2023 : आजचा गुरुवार खास! फक्त 'या' राशींच्या लोकांची होऊ शकते फसवणूक; पाहा सर्व 12 राशीचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 23 November 2023: राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 23 नोव्हेंबर 2023, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांचा आज ऑफिसमध्ये एखाद्याशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे मन खूप अस्वस्थ होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांच्या मनात काही गोष्टींबाबत नकारात्मकता असू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊया. वाचा सविस्तर