देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Israel Gaza Airstrike : इस्रायलकडून पुन्हा गाझावर एअरस्ट्राईक, एका रात्रीत 400 बळी


Israel Hamas War Update : इस्रायल (Israel) कडून हमास (Hamas) वरील हल्ले सुरुच आहेत. इस्रायलने गाझा पट्टी (Gaza Strip) मध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक (Airstrike) केला आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात (Israel Gaza Attack) एका रात्रीत 400 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर...


India-Canada Tensions : भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेणार? परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं


India-Canada Relations : भारत (India) कॅनडा (Canada) वरील व्हिसा (Visa) बंदी लागू घेऊ शकते, असे संकेत परराष्ट्र मंत्र्यांनी दिले आहेत. भारताच्या कॅनडातील राजदूतांच्या सुरक्षेत प्रगती दिसून आली आणि त्यांच्या सुरक्षेची हमी मिळाल्यास भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेऊ शकते, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. कॅनडा राजनयिकांसाठी सुरक्षित वातावरण देऊ शकला नाही, हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलं. वाचा सविस्तर...


PMFBY Scheme : मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार भेट! तलाव, ट्रॅक्टर आणि जनावरांनाही मिळणार पीक विम्याचा लाभ


Pradhan Mantri Fasal Bima Yojana : केंद्र सरकार (Central Governament) पंतप्रधान पीक विमान योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना होणार लाभ अधिक वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून (Modi Governament) प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना (Farmars) भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY Scheme) शेतकऱ्यांना सध्या पिकांसाठी विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. सरकार या विमा योजनेतील व्याप्ती वाढवण्याची तयारी करत आहे. येत्या काही दिवसांत या योजनेंतर्गत तलाव, ट्रॅक्टर, जनावरे आदींच्या विमा संरक्षणाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारकडून तयारी सुरू आहे. वाचा सविस्तर...


Assembly Election 2023 : 'इंडिया' आघाडीत वाद! रायबरेली आणि अमेठीत काँग्रेसचा डाव बिघडणार? राहुल-सोनिया यांच्या जागेबाबत प्रश्नचिन्ह


Assembly Election 2023 : केंद्रातील मोदी सरकारविरोधात लढा देण्यासाठी देशातील 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र, या इंडिया आघाडीचा पाया आता डगमगताना दिसत आहे. पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीला खिंडार पाडलं आहे. विधानसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीत वाद असल्याचं समोर आलं आहे. आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांच्या जागांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाचा सविस्तर...


Gujarat : धक्कादायक! गुजरातमध्ये गरबा खेळताना 24 तासात 10 जणांचा मृत्यू


Gujarat Heart Attack Deaths: आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या वयात त्याचा धोका वाढला आहे तो खूपच त्रासदायक आणि आश्चर्यकारक आहे. लोकांना अगदी लहान वयात देखील हृदयविकाराचा झटका येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना म्हणजे गुजरातमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 24 तासात या 10 मृत्यूंची नोंद झाली आहे. वाचा सविस्तर...


23 October In History: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म, जगप्रसिद्ध अॅपल कंपनीचा पहिला आयपोड लाँच; आज इतिहासात


मुंबई : कॉम्प्युटर, मोबाईल, आयपॉड यासह अनेक उत्पादने बनवणाऱ्या अॅपलची उत्पादने गुणवत्तेत सर्वोत्तम मानली जातात. अॅपलने 23 ऑक्टोबर 2001 मध्ये iPod बाजारात आणला. छोट्या आयपॉडने हजारो गाणी श्रोत्यांच्या खिशात अगदी आरामात बसवली. त्यावेळी हे जगातील सर्वात यशस्वी आणि क्रांतिकारक उत्पादन मानले गेले.प्रसिद्ध अभिनेता देवेन वर्मा यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. 21 ऑक्टोबर 1943 साली बोस यांच्या झाशीची राणी रेजिमेंटने सिंगापूरमध्ये प्रशिक्षण सुरु केले. ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक पार पडली. तर  ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म झाला होता.  आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा सविस्तर...


Navratri 9th Day Devi Siddhidatri : नवरात्रीचा 9 वा दिवस, सिद्धी आणि मोक्षाची देवी सिद्धिदात्री! पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, शुभ रंग जाणून घ्या


Navratri 9th Day Devi Siddhidatri : देवी दुर्गेचे (Goddess Durga) नववे रूप देवी सिद्धिदात्रीच्या पूजेने शारदीय नवरात्रीची सांगता होते. देवी सिद्धिदात्री ही नऊ दुर्गांपैकी शेवटची देवी आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी सिद्धिदात्री भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना कीर्ती, सामर्थ्य आणि संपत्ती प्रदान करते. शास्त्रात सिद्धिदात्री आईला सिद्धी आणि मोक्षाची देवी मानण्यात आली आहे. वाचा सविस्तर...


Horoscope Today 23 October 2023: सोमवारचा दिवस कोणत्या राशींसाठी उत्तम राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य, जाणून घ्या


Horoscope Today 23 October 2023 : जन्मकुंडलीनुसार आज म्हणजेच 23 ऑक्टोबर 2023, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज वृषभ राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील, वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत आनंदी व्हाल. इतर राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर...