India-Canada Relations : भारत (India) कॅनडा (Canada) वरील व्हिसा (Visa) बंदी लागू घेऊ शकते, असे संकेत परराष्ट्र मंत्र्यांनी (Minister of External Affairs of India) दिले आहेत. भारताच्या कॅनडातील राजदूतांच्या सुरक्षेत प्रगती दिसून आली आणि त्यांच्या सुरक्षेची हमी मिळाल्यास भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेऊ शकते, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, भारतातून कॅनडाची व्हिसा सेवा (Canada Visa Service) काही आठवड्यांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली. कॅनडातील भारतीय मुत्सद्दींच्या सुरक्षेची चिंता हे यामागचं मूळ कारण होतं. कॅनडा राजनयिकांसाठी सुरक्षित वातावरण देऊ शकला नाही, हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे, असंही जयशंकर यांनी (Minister of External Affairs of India S. Jaishankar) म्हटलं.


भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेणार?


खलिस्तानच्या मुद्दा तापल्याने भारताने कॅनडावर व्हिसा बंदी लागू केली होती. भारत आणि कॅनडा दोन्ही देशामध्ये सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) हरदीपसिंह निज्जरची (Hardeep Singh Nijjar) हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केला. भारताने हरदीपसिंह निज्जरच्या हत्येचे आरोप फेटाळले. पण, कॅनडातील भारताच्या उच्च राजनैतिक अधिकाऱ्यांना ओटावा सोडण्यास सांगितलं. यानंतर, भारताने कॅनडाला झटका देत कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्ली सोडण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवाही बंद करण्यात आली होती.


परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं


भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, कॅनडातील आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत प्रगती झाल्याचे दिसल्यास आम्ही व्हिसा सेवा सुरू करण्याचा विचार करू. मला आशा आहे की, हे लवकरच होईल.  काही आठवड्यांपूर्वी भारताने कॅनडात व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबवली होती. याचं कारण म्हणजे कॅनडामधील आमचे मुत्सदी सुरक्षित नव्हते. त्यांच्या सुरक्षिततेची बाब लक्षात घेत आम्हाला व्हिसा सेवा तात्पुरती बंद करावी लागली.


परराष्ट्र मंत्री नेमकं काय म्हणाले?


कॅनडातील भारतीय मुत्सदींच्या सुरक्षेची स्थिती सुधारेल, अशी आशा परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सुरक्षेत सुधारणा झाल्यास मुत्सद्दींना आत्मविश्वासाने काम करणं शक्य होईल, असंही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटलं आहे. मुत्सदींची सुरक्षा सुनिश्चित करणे ही व्हिएन्ना करारातील सर्वात मूलभूत बाब आहे. सध्या कॅनडामध्ये अशी अनेक आव्हाने आहेत, ज्यामुळे आमचे लोक सुरक्षित नाहीत. आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षाही धोक्यात आहे. राजनयिकांच्या सुरक्षेत प्रगती होताच व्हिसा सेवा सुरू होईल, असं जयशंकर यांनी सांगितलं.


कॅनडाच्या 41 मुत्सद्दींना बाहेरचा रस्ता


भारतीय मुत्सदीना कॅनडातून माघारी धाडल्यानंतर भारतानेही कॅनडाच्या मुत्सदींना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे अलिकडेच कॅनडाचे 41 मुत्सद्दी भारत सोडून गेले आहेत. त्यांना नवी दिल्ली सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की, व्हिएन्ना कराराद्वारे मुत्सद्दींच्या संख्येत समानता हा एक संबंधित आंतरराष्ट्रीय नियम आहे. एका देशात किती मुत्सद्दी असावेत यावर, हे संपूर्ण प्रकरण आधारित आहे. ही एक प्रणाली दोन्ही देशांना एकसारखी लागू होते. आम्ही कॅनडाला संख्या समान ठेवण्यास सांगितलं कारण त्यांचे अधिकारी हस्तक्षेप करत होते.


महत्वाच्या इतर बातम्या :


India-Canada : भारतानं फटकारल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले! आता म्हणतायत, भारतासोबत संबंध महत्वाचे