Israel Hamas War Update : इस्रायल (Israel) कडून हमास (Hamas) वरील हल्ले सुरुच आहेत. इस्रायलने गाझा पट्टी (Gaza Strip) मध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक (Airstrike) केला आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात (Israel Gaza Attack) एका रात्रीत 400 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमास (Israel Hamas war) यांच्यातील युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel Hamas Conflict) यांच्यातील युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे. इतर देशांकडून हा संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना इस्रायल आणि हमास मायतत्र, एकमेकांवर तीव्रतेने हल्ले करत आहे. इस्रायलकडून गाझामध्ये बॉम्बहल्ले आणि हवाई हल्ले सुरुच आहेत.


एका रात्रीत 400 लोकांचा मृत्यू 


गेल्या 24 तासांत इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामध्ये सुमारे 400 लोक मारले गेल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFA च्या वृत्तानुसार, पॅलेस्टिनी प्रदेशातील निवासी भागांना लक्ष्य करून सुमारे 25 इस्रायली हवाई हल्ले केल्याचं सांगण्यात येत आहे.






लेबनॉनमधील हिजबुल्ला लष्करी तळांवर हल्ला


इस्रायल लष्कराकडून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमाससह हिजबुल्लाच्या लष्करी तळांवर देखील हल्ला करण्यात येत आहे. इस्रायल लष्कर (IDF) च्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, लष्कराने लेबनॉनमधील हिजबुल्ला लष्करी तळांवर आणि निरीक्षण पोस्टवर हल्ला केला. याशिवाय लेबनीज सीमेवर कार्यरत असलेल्या हिजबुल्लाहच्या पथकावर लढाऊ विमानाने हल्ला करून त्यांची शस्त्रे नष्ट केल्याचा दावा केला आहे.


इस्रायल-हमास युद्धात हजारो जणांचा मृत्यू


पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 1,400 हून अधिक इस्रायली लोक मारले गेले आहेत आणि सुमारे 5 हजार जखमी झाले आहेत. त्याचवेळी हमासच्या लढाऊंनी जवळपास 215 लोकांना ओलीस ठेवले आहे. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे 4,651 लोक मारले गेले आहेत आणि 14,245 हून अधिक जखमी झाले आहेत.


जीवनावश्यक वस्तूंसाठी गाझातील नागरिकांचा संघर्ष


या युद्धादरम्यान गाझा पट्टीत राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना मूलभूत गोष्टींसाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. इस्रायली हल्ल्यामुळे गाझामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.  अन्न आणि पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गाझामध्ये पोहोचलेली मानवतावादी मदत पुरेशी नाही, अससं जागतिक मदत संस्थांनी सांगितलं आहे. युनायटेड नेशन्सने संपूर्ण गाझामध्ये मानवतावादी मदत देण्याचं आवाहन केलं आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


India-Canada Tensions : भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेणार? परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं