Navratri 9th Day Devi Siddhidatri : देवी दुर्गेचे (Goddess Durga) नववे रूप देवी सिद्धिदात्रीच्या पूजेने शारदीय नवरात्रीची सांगता होते. देवी सिद्धिदात्री ही नऊ दुर्गांपैकी शेवटची देवी आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी सिद्धिदात्री भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना कीर्ती, सामर्थ्य आणि संपत्ती प्रदान करते. शास्त्रात सिद्धिदात्री आईला सिद्धी आणि मोक्षाची देवी मानण्यात आली आहे.



देवीचे रुप कसे आहे?



देवी सिद्धिदात्रीला अणिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्या, गरिमा, लघिमा, इशित्व आणि वशित्व अशा 8 सिद्धी प्राप्त आहेत. देवी सिद्धिदात्री महालक्ष्मी सारख्या कमळावर विराजमान आहेत. देवीला चार हात आहेत. आईने हातात शंख, गदा, कमळाचे फूल आणि चकती घेतली आहे. माता सिद्धिदात्री हे देखील माता सरस्वतीचे रूप मानले जाते.



सिद्धी आणि मोक्षाची देवी


देवी सिद्धिदात्री ही सर्व सिद्धी भक्तांना आणि साधकांना प्रदान करण्यास सक्षम आहे. देवीपुराणानुसार भगवान शंकरांनी आपल्या कृपेनेच ही सिद्धी प्राप्त केली होती. त्यांच्या कृपेने भगवान शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे ते अर्धनारीश्वर नावाने लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. सिद्धिदात्री देवीची उपासना केल्यास देवी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी धारणा आहे.



देवी सिद्धिदात्रीची पूजा पद्धत


सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
देवीच्या मूर्तीला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घाला.
देवीला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. 
धार्मिक मान्यतेनुसार देवीला पांढरा रंग आवडतो.
देवीला आंघोळ केल्यावर पांढरे फूल अर्पण करावे.
देवीला चंदन कुंकू लावावी.
देवीला मिठाई, सुका मेवा, फळे अर्पण करा.
देवी सिद्धिदात्रीला प्रसाद, नवरसयुक्त अन्न, नऊ प्रकारची फुले, नऊ प्रकारची फळे अर्पण करावीत.
देवी सिद्धिदात्रीला फळे, हरभरा, पुरी, खीर, नारळ आणि हलवा खूप आवडतो. 
असे म्हणतात की या वस्तू देवीला अर्पण केल्याने ती प्रसन्न होते.
देवी सिद्धिदात्रीचे जास्तीत जास्त ध्यान करावे.
तसेच देवीची आरती करावी.
नवमीच्या दिवशी कन्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी कन्येची पूजा करा.


शुभ रंग


नवरात्रीच्या नवव्या तिथीला जांभळा रंग परिधान करणे शुभ असते. हा रंग अध्यात्माचे प्रतीक आहे.


 


देवी सिद्धिदात्री पूजा मंत्र


सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि,
सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी।


ओम देवी सिद्धिदात्र्यै नमः।


अमल कमल संस्था तद्रज:पुंजवर्णा, कर कमल धृतेषट् भीत युग्मामबुजा च।


मणिमुकुट विचित्र अलंकृत कल्प जाले; भवतु भुवन माता संत्ततम सिद्धिदात्री नमो नम:।


 


देवी सिद्धिदात्री बीज मंत्र


ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नम:


देवी सिद्धिदात्री प्रार्थना मंत्र


सिद्ध गन्धर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि।


सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।



देवी सिद्धिदात्री स्तुति मंत्र


या देवी सर्वभूतेषु माँ सिद्धिदात्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Navratri 2023 : नवरात्रीत 'या' राशींच्या नशीबाचे कुलूप उघडणार! देवी आशीर्वादाचा करणार वर्षाव